Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Prediction About Kaliyug In Marathi, Brahmvaivart Puran And Facts About Life

कलियुगाची भविष्‍यवाणी: वयाच्‍या 16व्‍या वर्षी केस होतील पांढरे आणि 20व्‍या वर्षीच येईल वृद्धत्‍व

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 16, 2018, 12:50 PM IST

ब्रह्मपुराणामध्‍ये कलियुगात कशाप्रकारचे वातावरण राहिल, मनुष्‍याचे जीवन कसे राहिल, स्‍त्री-पुरुषांचे संबंध कसे राहतील याब

 • Prediction About Kaliyug In Marathi, Brahmvaivart Puran And Facts About Life

  ब्रह्मपुराणामध्‍ये कलियुगात कशाप्रकारचे वातावरण राहिल, मनुष्‍याचे जीवन कसे राहिल, स्‍त्री-पुरुषांचे संबंध कसे राहतील याबद्दल भविष्‍यवाणी केली गेली आहे.

  ब्रह्मवैवर्तपुराणामध्‍ये सांगितले आहे की, कलियुगामध्‍ये एक वेळ अशी येईल जेव्‍हा व्‍यक्‍तीचे आयुष्‍यमान फार कमी होऊन जाईल. मनुष्‍याची युवावस्‍था समाप्‍त होऊन जाईल. 16व्‍या वर्षीच केस पांढरे होतील व 20व्‍या वर्षी वृद्धत्‍व येईल.

  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कलियुगातील कोणकोणत्‍या गोष्‍टींची भविष्‍यवाणी पुर्वीच झाली आहे...

 • Prediction About Kaliyug In Marathi, Brahmvaivart Puran And Facts About Life

  मनुष्‍याचे आयुष्‍यमान होईल फार कमी
  कलियुगात मनुष्‍याचे आयुष्‍यमान फार कमी होईल. पुरातन काळी मनुष्‍य जवळपास 100 वर्षे जगत होता. मात्र हळूहळू त्‍याचे वयमान कमी होत जाईल व एक वेळी अशी येईल जेव्‍हा तो 20व्‍या वर्षीच वृद्ध बनेल आणि 16 व्‍या वर्षीच त्‍याचे केस पांढरे बनतील.

 • Prediction About Kaliyug In Marathi, Brahmvaivart Puran And Facts About Life

  गंगाही वैकुंठात जाईल
  कलियुगाच्‍या 5000 वर्षांनंतर गंगा नदी पुर्णपणे सुखून जाईल आणि त्‍यानंतर ती वैकुंठ धमला परतेल. मनुष्‍य पुजन, कर्म, व्रत-उपवास असे धार्मिक कार्य करणे बंद करेल.

 • Prediction About Kaliyug In Marathi, Brahmvaivart Puran And Facts About Life

  समाज हिंसक बनेल
  कलियुगातील समाज हिंसक असणार आहे. मानवता नष्‍ट होऊन जाईल. जे बलवान असतील त्‍यांचेच राज्‍य राहिल. नातेसंबंध नाहिसे होतील. भाऊच भावाचा शत्रु बनेल.

 • Prediction About Kaliyug In Marathi, Brahmvaivart Puran And Facts About Life

  लोक अनैतिक गोष्‍टी वाचतील, ऐकतील व पाहतील
  कलियुगात लोक शास्‍त्रांपासून तोंड फिरवतील. त्‍यांना केवळ अनैतिक साहित्‍यच आवडेल. वाईट शब्‍दांनेच व्‍यवहार केला जाईल.

 • Prediction About Kaliyug In Marathi, Brahmvaivart Puran And Facts About Life

  अन्‍न आणि फळं मिळणार नाहित
  एक वेळ अशी येईल जेव्‍हा जमिनीतून धान्‍य उगवणे बंद होईल. झाडांवर फळ येणार नाहित. गाय दुध देणे बंद करेल. हळूहळू या सर्व वस्‍तू विलूप्‍त होतील. 

 • Prediction About Kaliyug In Marathi, Brahmvaivart Puran And Facts About Life

  स्‍त्री-पुरूष दोघेही बनतील अधर्मी
  कलियुगात एक वेळ अशी येईल, जेव्‍हा स्‍त्री-पुरूष दोघेही अधर्मी होतील. स्‍त्री पतिव्रत धर्माचे पालन करणे बंद करेल. पुरूषही असेच वागेल. स्‍त्री-पुरूषांतील सर्व वैदिक नियम नष्‍ट होऊन जातील.

 • Prediction About Kaliyug In Marathi, Brahmvaivart Puran And Facts About Life

  कल्कि अवतार करेल अधर्मियांचा नाश
  कलियुगाच्‍या अंतिम काळादरम्‍यान भगवान विष्‍णु कल्कि अवतारामध्‍ये पृथ्‍वीवर प्रकट होतील. विष्‍णुशया नावाच्‍या ब्राह्मणाच्‍या घरी ते जन्‍म घेतील. भगवान कल्कि उंच घोड्यावर बसून आपल्‍या विशाल तरलवारीने सर्व अधर्मिर्यांचा नाश करतील. भगवान कल्कि केवळ 3 दिवसांत सर्व अधर्मिर्यांचा नाश करतील.

Trending