Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Religious Tips For Food

जेवणाशी संबधित या 13 गोष्टी बदलू शकतात तुमचे भाग्य, नेहमी लक्षात ठेवा

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 04, 2018, 06:23 PM IST

जेवताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास आरोग्य लाभासोबतच देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते.

 • Religious Tips For Food

  जेवताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास आरोग्य लाभासोबतच देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जेवण करताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या गोष्टींकडे लक्ष दिल्यास वाईट काळापासून मुक्ती मिळू शकते. जेवताना मुख योग्य दिशेला असणे आवश्यक आहे.


  1. या उपायाने वाढते आयुष्य
  जेवण करण्यापूर्वी पाच अवयव (दोन हात, दोन पाय आणि तोंड) चांगल्याप्रकारे धुवून घ्यावे. असे मानले जाते, की जेवण करताना आपले पाय ओले असल्यास आरोग्य लाभ प्राप्त होतात तसेच आयुष्य वाढते.


  पुढे जाणून घ्या, जेवताना इतर कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास कोणकोणते लाभ होतात...

 • Religious Tips For Food

  2. जेवताना दिशांकडे द्या लक्ष
  - पूर्व आणि उत्तर दिशेकडे तोंड करून जेवण करावे. या उपायाने आपल्या शरीराला अन्नाची जास्त उर्जा प्राप्त होते.
  - दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करणे अशुभ मानले जाते.
  - पश्चिम दिशेला तोंड करून जेवण केल्यास रोगांमध्ये वृद्धी होते.

 • Religious Tips For Food

  3. या स्थितीमध्ये जेवण करू नये
  - पलंगावर बसून किंवा हातामध्ये ताट घेऊन कधीच जेवण करू नये.
  - तुटलेल्या किंवा फुटलेल्या भांड्यातसुध्दा जेवण करू नये.
  - उभे राहून जेवण करू नये. नेहमी बसूनच जेवण करावे.
  - जेवणाचे ताट लाकडी पाटावर ठेवून मग जेवण करावे.

 • Religious Tips For Food

  4. जेवणापूर्वी हा एक उपाय करा
  - जेवण करण्यापूर्वी देवी-देवतांचे किंवा अन्नपूर्ण मातेचे स्मरण करावे. सोबतच, अशी प्रार्थना करावी, की सर्व उपाशी लोकांना अन्न मिळो.
  - कधीही ताटात वाढलेल्या अन्नाला नाव ठेऊ नयेत. असे केल्यास अन्नाचा अपमान होतो आणि ते खाल्ल्यास शरीरात कधीच उर्जा प्रप्त होत नाही.

 • Religious Tips For Food

  5. जेवण तयार करणाऱ्या व्यक्तीने लक्षात ठेवाव्यात या गोष्टी
  - व्यक्तीने स्नान करून आणि पवित्र होऊन स्वयंपाक करावा
  - स्वयंपाक करताना मन शांत ठेवावे तसेच, या दरम्यान कोणाबद्दलही वाईट बोलू नये.
  - शुद्ध मनाने स्वयंपाक केल्यास जेवण चविष्ट बनेल आणि कधीह अन्नाची कमतरता भासणार नाही.
  - जेवण बनवताना देवी-देवतांचे नामस्मरण करावे.
  - जेवण बनवल्यानंतर सर्वात पहिले तीन पोळ्या बाजूला काढून ठेवाव्यात. एक गायीला, एक श्वानाला आणि एक पोळी कावळ्याला द्यावी. जेवण करण्यापूर्वी अग्नी देव आणि इतर देवी-देवतांनासुध्दा नैवेद्य दाखवावा.

Trending