Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Religious Tips In Hindi For Happiness, How To Be Happy In Life

स्त्री-पुरुषाला उद्धवस्त करू शकतात हे 5 काम, जास्त काळ लपवून ठेवणे शक्य नाही

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 27, 2018, 04:13 PM IST

कोणतेही चुकीचे काम जास्त काळापर्यंत लपून राहत नाही. वर्तमानात अशा कामांना लपवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो

 • Religious Tips In Hindi For Happiness, How To Be Happy In Life

  कोणतेही चुकीचे काम जास्त काळापर्यंत लपून राहत नाही. वर्तमानात अशा कामांना लपवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, परंतु भविष्यात हे कामं सर्वांसमोर उघड होतातच. जेव्हा कुटुंब, समाज आणि प्रत्येकाला आपल्या चुकीच्या कामाबद्दल समजते तेव्हा व्यक्तीला अपमानित व्हावे लागते तसेच विविध अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, हे 5 कामं कोणकोणते आहेत.


  चुकीच्या या कामांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....

 • Religious Tips In Hindi For Happiness, How To Be Happy In Life

  1. खोटे बोलणे
  सर्वांनाच माहिती आहे की, एक खोटं लपवण्यासाठी शंभर खोटे बोलावे लागतात, तरीही असत्य जास्त काळ लपून राहत नाही. महाभारतामध्ये कर्ण गुरु परशुरामांना खोटे बोलला होता की, तो ब्राह्मण आहे. परशुरामांनी त्याला ब्राह्मण समजून सर्व शस्त्र-अस्त्रांचे ज्ञान दिले. परंतु एके दिवशी कर्ण ब्राह्मण नसल्याचे सत्य परशुरामांना समजले. त्यानंतर त्यांनी कर्णाला शाप दिला की, ज्यावेळी तुला मी दिलेल्या ज्ञानाची सर्वात जास्त आवश्यकता असेल तेव्हा तू हे ज्ञान विसरून जाशील. याच शापामुळे कर्ण महाभारत युद्धामध्ये अर्जुनासमोर सर्व शक्तींचे ज्ञान विसरून गेला. यामुळे कधीही खोटे बोलू नये.

 • Religious Tips In Hindi For Happiness, How To Be Happy In Life

  धोका देणे किंवा कपट करणे
  महाभारताचे युद्ध दुर्योधन आणि मामा शकुनी यांचा धोका आणि कपटाचे कारण होते. कौरवांनी पांडवांसोबत नेहमी कपट कारस्थान रचले आणि शेवटी पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा नाश झाला. कपटी लोकांची मदत देवसुद्धा करत नाहीत. यामुळे कधीही कपट कारस्थान रचू नये. कपट कधीही जास्तकाळ लपून राहत नाही. इतरांना धोका देणे पाप असून या पापाची शिक्षा अवश्य मिळते.

 • Religious Tips In Hindi For Happiness, How To Be Happy In Life

  एखाद्याची हत्या करणे
  या पापाची शिक्षा अवश्य भोगावी लागते. शास्त्रानुसार कोणत्याही जीवाची हत्या करणे अक्षम्य पाप आहे. अक्षम्य म्हणजे ज्याच्यासाठी क्षमा केले जाऊ शकत नाही. हत्या कधीही लपून राहत नाही. हत्या करणाऱ्या व्यक्तीला उशिरा का होईना पण शिक्षा अवश्य मिळते. हे पाप लपवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतात.

 • Religious Tips In Hindi For Happiness, How To Be Happy In Life

  अहंकार करणे
  जे अहंकारी असतात, ते लोक जास्त काळापर्यंत हे भाव लपवून ठेवू शकत नाहीत. अहंकारी व्यक्तीने स्वतःला कितीही सज्जन दाखवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा अहंकार सर्वांसमोर येतोच. अहंकारामुळे व्यक्ती पाप करायलाही मागेपुढे पाहत नाही. या कारणामुळे अहंकारी व्यक्तीला पाप श्रेणीत ठेवले जाते. रावण आणि दुर्योधन अहंकारामुळे नेहमी पाप करत राहिले.

 • Religious Tips In Hindi For Happiness, How To Be Happy In Life
  व्यभिचार म्हणजे चुकीचे संबंध बनवणे
  जे स्त्री-पुरुष विवाहबाह्य संबंध बनवतात, ते लोक हे काम लपवण्याचा खूप प्रयत्न करतात. परंतु हे काम लपून राहत नाही आणि एखाद्या दिवशी सर्वांसमोर उघड होते. या कामासोबतच इतर चुकीचे कामही वाढत जातात आणि यामुळे स्त्री-पुरुष दोघेही स्वतःच्या विनाश करून घेतात. शास्त्रामध्ये हे महापाप मानले गेले आहे.

Trending