आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिदेवाला ज्योतिष उपाय न करताही या 5 कामांनी करू शकता प्रसन्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनीला ज्योतिषमध्ये क्रूर ग्रह मानण्यात आले आहे. क्रूर यामुळे कारण शनीच्या वाईट प्रभावामध्ये व्यक्ती चारही बाजुंनी अडचणीत सापडतो. विशेषतः शनी ढय्या, साडेसाती आणि महादाशेच्या काळात व्यक्तीला जास्त त्रास होतो. यामधील कॉमन समस्या म्हणजे, जॉबमध्ये अडचणी, अचानक ट्रान्स्फर होते, कष्टाचे पूर्ण फळ मिळत नाही, स्वतःचे सिक्रेट उघड होतात, आणि पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहते. या गोष्टीमुळे व्यक्ती कमकुवत होतो.


परंतु, केवळ ज्योतिषीय उपाय करून शनिदेवाला प्रसन्न केले जाऊ शकते असे नाही. 5 काम असे सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो. यासाठी तुम्हाला वेगळे कष्टही करावे लागत नाहीत. फक्त आपल्या सवयी आणि दिनचर्येत काही बदल करावे लागतील. हे बदल तुम्हाला कोणतेही ज्योतिष उपाय न करता शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचवू शकतात.


दिनचर्येत करा हे पाच बदल...
रोज थोडावेळ व्यायाम करावा - दररोज थोडासा व्यायाम करावा किंवा वॉक घ्यावा. शरीरातून घाम निघणे शनीच्या अशुभ प्रभावाला दूर करतो. ज्योतिष शास्त्रानुसार घामामध्ये शनीचा वास मानण्यात आला आहे.


कष्ट सोडू नका - ढय्या आणि साडेसातीमध्ये शनी जास्त काम करवून घेतो. ढय्याला लघु कल्याणी असेही म्हणतात. कारण यामुळे तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतात आणि या कष्टाचे फळही मिळते. जर तुम्ही शनीच्या ढय्या आणि साडेसाती काळात कष्ट सोडून दिले तर याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.


चुकीच्या कामाकडे दुर्लक्ष करा - ढय्या आणि साडेसातीच्या काळामध्ये व्यक्तीला चुकीचे काम करण्याची जास्त संधी मिळते, या संधीचा फायदा घेऊन तुम्ही पैसा कमवत असाल तर शनिदेव दंडित करतात. यामुळे चुकीच्या कामामध्ये कधीही सहभागी होऊ नका. 


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर दोन कामे...

बातम्या आणखी आहेत...