Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | The Life Formula Of Mahabharata

फक्त खरे बोलणाऱ्या लोकांनाच मिळतात हे 4 लाभ

रिलिजन डेस्क | Update - Jun 13, 2018, 12:42 PM IST

खरे बोलणे फक्त मनुष्याचा चांगुलपणा नाही तर जीवनात अनेक गोष्टी मिळवण्याचा एक रस्ता आहे.

 • The Life Formula Of Mahabharata

  खरे बोलणे फक्त मनुष्याचा चांगुलपणा नाही तर जीवनात अनेक गोष्टी मिळवण्याचा एक रस्ता आहे. जो मनुष्य नेहमी खरे बोलतो, खरेपणाची साथ देतो आणि रागाला दूर ठेवतो त्याला अनेक प्रकारचे सुख मिळते. महाभारताच्या या श्लोकने जाणुन घ्या अशा लोकांना कोणकोणते फायदे होतात.


  श्लोक
  सत्यावादी लभेतायुरनायासमथार्जवम्।
  अक्रोधधनोनसूयश्च निर्वृतिं लभते पराम्।।


  1. दिर्घायुष्य
  महाभारतात मनुष्याचे अनेक गुणांविषयी सांगितले आहे. ज्यामध्ये त्यांचे आयुष्य वाढणे आणि कमी होण्याविषयी देखील सांगितले आहे. जो मनुष्य नेहमी खरे बोलतो आणि कोणत्याच परिस्थितीत खोटे बोलण्याकडे आकर्षीत होत नाही, तो नक्कीच दिर्घकाळ जगतो. अशा मनुष्याला कोणत्याच गोष्टीची भीती आणि मोह नसतो. त्याच्यावर नेहमी देवाची कृपा असते आणि देव त्याला दिर्घयुष्य देतो.


  2. क्लेशरहित म्हणजेच सुखी जीवन
  अनेक ग्रंथात सांगितले आहे की खरेपणा, सुख आणि शांतिचे तर खोटेपणा दूःख आणि अडचणींचे कारण असते. खोटे बोलण्याची सवय, लहान लहान गोष्टीबाबत ईर्षा करण्याची सवय जीवनात दूखांचे कारण बनते. जो मनुष्य नेहमी सत्याची साथ देतो त्याच्या जीवनात सुख असते. अशा मनुष्याच्या जीवना अडचणी आणि क्लेश यांसाठी जागा नसते.


  पुढील स्लाईडवर जाणुन घ्या महाभारताच्या या गोष्टींविषयी...

 • The Life Formula Of Mahabharata

  3. साधेपणा
  जो मनुष्य खोटे बोलत नाही, छळ-कपट करत नाही, ज्याच्या मनात लालुच-ईर्षा अशा भावना नसतो तो साध्या स्वभावाच असतो. साधा मनुष्य आपल्या सर्व अचणींचा मार्ग छळ न करता सहज काढतो. असा मनुष्य जीवनात सुखासोबत मान-सन्मान मिळतो. यामुळे प्रत्येकाने खरे बोलण्याची सवय ठेवली पाहिजे.

   

  4. क्रोध न करणारा मनातुन नेहमी शांत असतो
  श्लोकामध्ये सांगितले आहे की, जो मनुष्य क्रोधापासुन दूर राहतो तो खुप भाग्यवान असतो. कारण क्रोध एक चक्र आहे, ज्यामध्ये फसल्यावर मनुष्य आपले-परके, चांगल्या-वाईट कोणत्याच गोष्टी लक्षात ठेवत नाही. क्रोध करणारा व्यक्ती आपले मित्र आणि नातेवाईकांसाठी अडचणींचे कारण बनु शकतो. जो मनुष्य आपल्या रागावर नियंत्रण करणे जाणतो, त्याच्या जीवनात नेहमी शांतता असते. यामुळे प्रत्येकाने रागाला त्यागुन शांत आणि संतुष्ट स्वभावाने राहिले पाहिजे.

Trending