Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Tips About Happy Life In marathi

​या 5 गोष्टींमुळे सुरु होऊ शकतो तुमचा वाईट काळ, यापासून दूर राहा

युटिलिटी डेस्क | Update - Mar 12, 2018, 05:54 PM IST

आयुष्य जगत असताना शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपण विविध

 • Tips About Happy Life In marathi
  आयुष्य जगत असताना शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो. गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित संक्षिप्त गरुड पुराणाच्या नीतिसार अध्यायामध्ये सुखी आणि यशस्वी जीवनासाठी विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुराणात सांगण्यात आले आहे की, कोणत्या गोष्टींमुळे व्यक्ती आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या गोष्टी...

 • Tips About Happy Life In marathi

  अज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान -
  कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी त्या कामाशी संबंधित संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. अज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान नेहमी अडचणी निर्माण करते. यामुळे व्यक्तीने नेहमी ज्ञान अर्जित करत राहावे. एखाद्या विषयाची जासित जास्त माहिती असल्यास व्यक्ती चांगल्या-वाईट कामामध्ये योग्य निर्णय घेऊ शकतो.

 • Tips About Happy Life In marathi

  अहंकार -
  अहंकार म्हणजे स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना तुच्छ समजणे. जे लोक फक्त मीपणा आणि अहंपणामध्ये जगतात, ते जीवनात कधीही यश प्राप्त करू शकत नाहीत. एखाद्या कामामध्ये यश मिळाले तरी ते स्थायी नसते. अहंपणाची भावना व्यक्तीच्या पतनाचे कारण ठरते.

 • Tips About Happy Life In marathi

  अत्याधिक मोह -
  कोणत्याही गोष्टीबद्दल अधिक मोह करणे अडचणींचे कारण बनते. अनेक लोक मोहापायी योग्य आणि अयोग्यामधील अंतर विसरून जातात. मोहाला मुळाचे प्रतिक मानले जाते. मूळ म्हणजे हे व्यक्तीला पुढे जाऊ देत नाही, बांधून ठेवते. मोहाच्या आधीन झालेला व्यक्ती स्वतःच्या बुद्धीचा योग्य उपयोग करू शकत नाही. व्यक्ती पुढे सरकला नाही तर यश कसे संपादन करणार.
  राजा धृतराष्ट्र यांना दुर्योधन, हस्तिनापुर आणि सिंहासनाचा अत्याधिक मोह होता. याच कारणामुळे त्यांनी दुर्योधनाच्या प्रत्येक अधार्मिक कार्याला दुर्लक्षित केले. या मोहामुळे कौरवांचा सर्वनाश झाला.

 • Tips About Happy Life In marathi

  क्रोध -
  जर एखाद्या व्यक्तीच्या मानतील गोष्ट पूर्ण झाली नाही तर त्याला राग येणे स्वाभाविक आहे. जे लोक या क्रोधावर नियंत्रण मिळवतात त्यांना निकट भविष्यातील कामामध्ये यश अवश्य मिळते. याउलट जे लोक क्रोधावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, ते आवेशात येउन चुकीचे काम करतात. यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते.

 • Tips About Happy Life In marathi

  असुरक्षेची भावना किंवा मृत्यूची भीती -
  ज्या लोकांच्या मनामध्ये असुरक्षेची भावना असते, ते कोणतेही कार्य एकाग्रतेने पूर्ण करू शकत नाहीत. प्रत्येक क्षणी स्वतःला असुरक्षित समजतात आणि स्वतःला सुरक्षित करण्याच्या विचारात राहतात.

Trending