Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | tips for success in life

या दोन गोष्टी थांबवतात व्यक्तीची प्रगती, चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका

रिलिजन डेस्क | Update - Jun 11, 2018, 12:25 PM IST

तुम्हाला तुमच्या मेंदूच्या ताकदीचा जादा वापर करण्यापासून रोखणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

  • tips for success in life

    तुम्हाला तुमच्या मेंदूच्या ताकदीचा जादा वापर करण्यापासून रोखणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आडमुठेपणा आणि दुसरे म्हणजे एकाच ठिकाणी जाऊन तेथेच थांबणे. जे लोक हट्टी, कठेार आणि न बदलणारे असतात, अशा लोकांचे इतरांप्रती वागणे कठोर असते. ही एक अशी व्यक्ती असते जी कोणत्याही निष्कर्षावर पोहोचून विचार करून बदलायला तयार असत नाही. अशा प्रकारच्या पूर्वाग्रहाला विचार करण्याची यांत्रिक पद्धतही म्हटले गेले पाहिजे. याच्या उलट म्हणजे लवचिक आणि खुल्या विचारांचा माणूस होय. याला परिस्थितीनुसार बदलला जाणारा िवचार म्हटला पाहिजे. अशा प्रकारचे लोक प्रत्येक नवी माहिती घेण्यासाठी इतरांपेक्षा उत्सुक असतात.

    नवीन विचार आणि घटनांबद्दल ते उत्सुक असतात. तसेच ते याबाबत स्वारस्यही दाखवितात. काय योग्य आहे यापेक्षा कोण बरोबर आहे, याची या लोकांना जास्त चिंता असते. जर कोणी अशा लवचिक विचार करणाऱ्या लाेकांकडे गेला आणि त्यांना नवा विचार सांगितला तर ते त्याचा लगेचच स्वीकार करतात. नव्या विचाराने आपल्या समस्या कशा संपतील तसेच नवे ध्येय कसे साध्य करता येईल, याचीच त्यांना जास्त चिंता असते. मेनिंगर इन्स्टिट्यूटनुसार एकविसाव्या शतकात यश मिळविण्यासाठी तुम्हाला ज्या गुणांची जास्त गरजे असते, ती म्हणजे विचार लवचिक असणे. विचारांचे लवचिकपण नवीन गोष्टी अजमाविण्याची तयार दर्शविते. याचा मुख्य अर्थ असा की, तुमच्यामध्ये जुन्या पुराण्या गोष्टींचा त्याग करण्याची तयारी अाहे आणि नव्या आणि जादा प्रभावी विचार आत्मसात करण्याची योग्यताही आहे. नव्या युगात यशस्वी होण्यासाठी याची फारच गरज आहे.

Trending