Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | We Must Complete These 4 Works, Other Wise We Will Face Problems

चुकूनही अर्धवट सोडू नका हे 4 काम, अन्यथा वाढू शकतात अडचणी

रिलिजन डेस्क | Update - May 14, 2018, 12:13 PM IST

सुखी आणि समृद्धशाली जीवन जगण्यासाठी शास्त्रामध्ये विविध महत्त्वपूर्ण सूत्र सांगण्यात आले आहेत.

 • We Must Complete These 4 Works, Other Wise We Will Face Problems

  सुखी आणि समृद्धशाली जीवन जगण्यासाठी शास्त्रामध्ये विविध महत्त्वपूर्ण सूत्र सांगण्यात आले आहेत. या सूत्रांचा अवलंब केल्यास आपले जीवन आनंदी राहू शकते. काही गोष्टी खूप शुल्लक असतात परंतु आपण त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


  शास्त्रामध्ये गरुड पुराणाचे विशेष स्थान आहे यामध्ये जीवन आणि मृत्युच्या रहस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. आपण केलेल्या कर्माचे कोणते फळ आपल्याला मिळते हे गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे. या पुराणामध्ये चार कामे अशी सांगण्यात आली आहेत, जी अर्धवट सोडणे नुकसानदायक ठरू शकते.


  पहिले काम -
  गरुड पुराणानुसार ऋण किंवा उधार घेतलेले पैसे कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण परत करावेत. जर कर्ज पूर्णपणे परत केले नाही तर पुन्हा व्याजामुळे कर्जाची रक्कम वाढू लागते. अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी कर्जाची रक्कम पूर्णपणे लवकर परत करावी.


  पुढील फोटोंवर क्लिक करा जाणून घ्या, कोणकोणती चार कामे अर्धवट सोडू नयेत...

 • We Must Complete These 4 Works, Other Wise We Will Face Problems

  दुसरे काम
  जर तुमचा एखादा शत्रू असेल आणि वारंवार तुम्ही प्रयत्न करूनही तो शत्रुत्व संपवण्यास तयार नसेल तर त्याला कोणत्याही प्रकारे शांत करावे. कारण शत्रू नेहमीच आपले वाईट करण्याच्या हेतूने योजना आखत असतो. शत्रुत्वाचा नाश केल्यानंतरच जीवनातील भय नष्ट होते.

 • We Must Complete These 4 Works, Other Wise We Will Face Problems

  तिसरे काम -
  एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याने औषधांच्या मदतीने आजार मुळापासून नष्ट करावा. जे लोक आजार ठीक झाला नसतानाही औषध घेणे बंद करतात त्यांना भविष्यात पुन्हा तो आजार होण्याची शक्यता असते. यामुळे आजारपणात सांगितलेले औषध पूर्णपणे घ्यावे.

 • We Must Complete These 4 Works, Other Wise We Will Face Problems

  चौथे काम
  एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर ती आग पूर्णपणे विझवावी. अन्यथा छोट्याश्या ठिणगीमुळे पुन्हा मोठी आग लागू शकते. यामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते.

Trending