आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वत:मध्ये बदल घडवणारा नेहमी टिकून राहतो, यशस्वी होतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण नेहमी फुलपाखराच्या सौंदर्याची स्तुती करतो; पण हे सौंदर्य मिळवण्यासाठी ते कोणत्या बदलातून जाते याबाबत कोणी विचार करत नाही. माणूसही परिवर्तनशील आहे. त्यामुळे गरजेनुसार तो नव्या गोष्टी करतो. कारण जुन्या रस्त्यावरून चालत नवी दारे उघडली जाऊ शकत नाहीत हे त्याला माहीत असते. 


सॉक्रेटिसने म्हटले आहे की, आपली संपूर्ण ऊर्जा बदलावर खर्च करा. जुन्याला हटवायचे आहे या दृष्टिकोनातून नाही तर नवीन बनवायचे आहे यातून. बदलाच्या काळात कधी-कधी आपल्याला असे वाटते की आपण अंधारात दबलो आहोत; पण आपण मातीत पेरलेले बी आहोत आणि त्यातून नवे रोप पल्लवित व्हावे, अशा दृष्टिकोनातूनही पाहता येते. जॉर्ज बर्नार्ड शॉने बदलाबाबत म्हटले आहे की, त्याशिवाय प्रगती शक्य नाही. जे लोक आपला विचार बदलू शकत नाहीत ते काहीच बदलू शकत नाहीत. चांगले दिवस आणि चांगल्या गोष्टी नेहमी तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये चालून येत नाहीत. त्यासाठी बाहेर पडून तुम्हालाच प्रयत्न करावे लागतात. 


हेन्री फोर्डने ही गोष्ट या शब्दांत म्हटली आहे-तुम्ही जे नेहमी करता तेच करत राहिलात तर जे नेहमी मिळते तेच तुम्हाला मिळेल. त्यामुळे नवे आणि वेगळे मिळवायचे असेल तर काही वेगळेही करावे लागेल. चार्ल्स डार्विनचे याबाबतचे म्हणणे आठवणीत ठेवण्यायोग्य आहे ते म्हणजे तुम्ही नेहमी मजबूत आणि बुद्धिमान राहावे हे गरजेचे नाही; पण जो स्वत:ला बदलतो तो नेहमी टिकून राहतो. 

बातम्या आणखी आहेत...