Home »Jeevan Mantra »Disha Jeevanachi» Accept Good Habits

आपल्यातील दुर्गुण बाजूला सारा

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 04, 2013, 17:40 PM IST

  • आपल्यातील दुर्गुण बाजूला सारा

भौतिक विश्वात आपणास आपले शत्रू आणि प्रतिस्पध्र्यांचा परिचय असतो. त्यांच्यापासून धोका संभवतो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक जगातही आपल्याला दुर्गुणांपासून सावध राहिले पाहिजे. जागरूक व्यक्ती दुर्गुणांना दररोज संपवत असतात. त्यांना थारा मिळू नये यासाठी सातत्याने सावधगिरी बाळगतात. दुर्गुणांवर थोडाही विश्वास ठेवू नका. त्यांना पूर्णपणे नष्ट करा. दुगरुणांचा थोडासा अंश रौद्ररूप धारण करतो. त्याचे ज्वाळेत रूपांतर होण्यास वेळ लागत नाही. यांना अनेक वाटा आहेत. मळलेल्या वाटेवरून ते कधीच जाणार नाहीत. सद्गुणांबरोबरच त्यांचा शरीरात प्रवेश कधी झाला हे मनुष्यप्राण्यांना समजतही नाही. वर्चस्वासाठी योग्य संधीची वाट पाहणे यांना चांगल्या रीतीने जमते. तेव्हा हे आपणास मागे खेचण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. अनेक संयमी व्यक्तींनी यांच्यासमोर हार मानली आहे.

Next Article

Recommended