Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | always washing the face not going the pimpalas

वारंवार चेहरा धुतल्याने पिंपल्स जात नाहीत

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jan 26, 2013, 07:53 AM IST

निरामय जीवनासाठी गैरसमजांपासून दूर राहणे आवश्यक आहे, अन्यथा आरोग्यास अपायकारक असलेल्या अनेक गोष्टी आपण करत राहतो.

 • always washing the face not going the pimpalas

  निरामय जीवनासाठी गैरसमजांपासून दूर राहणे आवश्यक आहे, अन्यथा आरोग्यास अपायकारक असलेल्या अनेक गोष्टी आपण करत राहतो. अशाच काही गैरसमजांबद्दल माहिती घेऊया...
  *अंडी हृदयासाठी घातक : अंड्यांत 200 मिलिग्रॅम कोलेस्ट्रॉलचे प्रमाण असते. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता बळावते. हृदयरोगतज्ज्ञांच्या मते दररोज एक अंडे खाल्ल्यास आरोग्यास काहीही अपाय होत नाही. आपल्याला आरोग्याची जास्तच काळजी वाटत असेल तर अंड्याचा पांढरा भागच फक्त खावा. त्यातील प्रोटीन्स आरोग्यास हितकारक ठरतील.
  * फ्ल्यू व सर्दीत फरक नाही : असे म्हणणे चूक आहे. सर्दी-पडशामुळे आरोग्याची फारशी हानी होत नाही. ती काही दिवसांत बरीही होऊन जाते. मात्र, फ्ल्यूमध्ये न्यूमोनियासारख्या गंभीर आजारांचा धोका असतो.
  * जास्त एसपीएफ, जास्त संरक्षण उन्हात जास्त वेळ घालवल्यास सुरकुत्या, चेह-या वर डाग, त्वचेच्या कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. एसपीएफने (सन प्रोटेक्शन फॅक्टर) यूव्ही-बी (अतिनील बी) किरणांपासून बचाव होतो. त्यामुळे यूव्ही-ए व यूव्ही-बी दोन्हींपासून बचाव करील असेच सनस्क्रीन वापरावे.
  * वारंवार चेहरा धुतल्याने मुरमांपासून सुटका होते : मुरमे होण्याची अनेक कारणे असतात. वारंवार चेहरा धुतल्याने ही समस्या आणखी वाढू शकते. कोरडी त्वचा असलेल्या लोकांना मुरमांची समस्या कमी जाणवते.

Trending