आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थकवा मनात की शरीरात...जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात शारीरिक काम करण्याबाबत अनोखी मानसिकता आहे. खूप कष्ट केल्यास थकून जाऊ, असा लोकांचा गैरसमज आहे. शरीर कष्ट करण्यासाठीच असते. उलट कष्ट न केल्यास ते थकते. समजा, थकल्यासारखे वाटते व घरी जाऊन निपचित पडू असा विचार येतो. मात्र, घरी जाताच स्वयंपाकगृहाला आग लागल्याचे दिसल्यास हा संपूर्ण थकवा पळून जाईल व आपण आग विझविण्यासाठी प्रयत्न करणार. आता ही शक्ती कोठून आली? अर्थात, आपल्याकडील शक्तींबाबत आपल्याला माहीत नसते. बाह्यरूपात दिसणाऱ्या शक्तीच्या छोट्याशा भागाचा उपयोग करून आपण जिवंत राहतो. जिवंत राहणे आणि जगणे यात फरक आहे.

झोपलेली ताकद जागवा आणि ज्या वेळी थकवा आल्यासारखे जाणवेल त्या वेळी नव्या दमाने कामाला लागा. दोन मिनिटांतच आपल्याला जाणवेल की थकवा दूर होऊन आपल्यात मोठी ताकद निर्माण झाली. थकवा क्षणभंगुर असतो. त्याचे काम मीटरप्रमाणे असते. आपण किती शक्तीचा उपयोग करतो हे ते सांगत असते. थकव्याची सवय आपणच लावून घेतलेली असते. मन सांगतो की आपण थकलो. काम केल्याने शरीरात आणखी ऊर्जेची निर्मिती होते. अशा वेळी नव्या जोमाने काम केल्यास सर्व मर्यादा तोडल्याची जाणीव आपल्याला क्षणार्धात होईल. उदा : दहा वाजता झोपायची सवय असल्यास रोज याच वेळी आपल्याला झोप येते. मात्र, एखादे वेळी ११ वाजेपर्यंत जागे राहिलो तर झोपच लागत नाही. याचा अर्थ वास्तविक मर्यादेच्या पलीकडे आपण गेलो आहोत. त्यानंतर आणखी जागे राहिल्यास आपल्याला जाणीव होईल की, ज्या शक्तीने आपण दहा वाजेपर्यंत जागे राहायचो ती मर्यादा संपुष्टात आली आहे. उलट एक नवी ऊर्जा आली आहे, ज्यामुळे आपण आणखी जागू शकतो. आपल्याकडे शक्तीचा साठा असतो, ज्यातून हवी तितकी ऊर्जा घेता येते. ज्या अस्तित्वाशी आपण निगडित असतो त्याच्या तळापर्यंत गेल्यास आपण अनंत ऊर्जेचे मालक बनू शकतो.
अमृत साधना
ओशो मेडिटेशन रिसॉर्ट, पुणे