आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीनकाळी फक्त नालंदामध्येच नाही तर या विद्यापीठातही जगभरातून येत होते विद्यार्थी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैदिक काळापासून भारतामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे त्या काळापासूनच गुरुकुल आणि आश्रमांचा रुपात शिक्षण केंद्र स्थापित केले जात होते. वैदिक काळानंतर ज्याप्रमाणे काळ बदलत गेला त्याप्रमाणे भारताची शिक्षण पद्धतीही अधिकच पल्लवित होत गेली. गुरुकुल आणि अाश्रमांपासून सुरु झालेला शिक्षणाचा हा मार्ग उन्नती करत विद्यापीठांमध्ये रुपांतरीत झाला. प्राचीन काळी संपूर्ण भारतात 13 भव्य विद्यापीठांची स्थापना करण्यात आली.

- तक्षशिला विद्यापीठ - हे ठिकाण सध्या पाकिस्तानात रावळपिंडीपासून वायव्येस सु. ३५ किमी. अंतरावर स्थित आहे.
- नालंदा विद्यापीठ - आधुनिक बिहारची राजधानी पटनापासून ५५ किमी दक्षिण-पूर्व( 450 इ. स. पू पासून 1193 इ. स.)
- उदांतपुरी - बिहारमध्ये ( 550 इ. स. पू - 1040)
- सोमपुरा - आता बांगलादेशात
- जगददला - पश्चिम बंगालमध्ये (पाल राजवंशापासून भारतात अरबी लोकांच्या आगमनापर्यंत)
- नागार्जुनकोंडा - आंध्र प्रदेशमध्ये
- विक्रमशिला विद्यापीठ - बिहारमध्ये ( 800 इ. स. पू - 1040)
- वल्लभी - गुजरातमध्ये
- वाराणसी - उत्तर प्रदेशमध्ये (आठव्या शतकापासून आठवीं आधुनिक काळापर्यंत)
- कांचीपुरम - तामिळनाडूमध्ये
- मणिखेत - कर्नाटकमध्ये
- शारदा पीठ - काश्मीरमध्ये
- पुष्पगिरी - ओडिशामध्ये

सध्याच्या काळातील अधिक लोकांना यामधील केवळ दोनच नालंदा आणि तक्षशिला या प्राचीन विद्यापीठांची माहिती आहे. हे दोन्ही विद्यापीठ खूप प्रसिद्ध होते. यामुळे आजही सामान्यतः लोकांना याच दोन विद्यापीठांची माहिती आहे. या व्यतिरिक्त आणखी 11 विद्यापीठ असे आहेत, जे त्याकाळी शिक्षणासाठी प्रसिद्ध होते. आज आम्ही तुम्हाला या प्राचीन विद्यापीठांची माहिती देत आहोत.