आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या उपायाने प्राप्त होते तल्लख बुद्धी, दूर होतात हे 5 क्लेश आणि 6 विकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या काळात ज्या लोकांची तल्लख बुद्धी असेल तेच जलद गतीने यश प्राप्त करतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढली आहे. अशा स्थितीमध्ये जे लोक परिस्थिती समजून घेण्यासाठी जास्त वेळ लावतात ते यश प्राप्त करू शकत नाहीत. आज अनेक लोक क्लेश विकाराचे शिकार होऊन बसले आहेत. क्लेश म्हणजे कष्ट, मानसिक तणाव, चिंता आणि विकार म्हणजे दोष, वाईटपणा. तल्लख बुद्धीसोबतच क्लेश आणि विकार दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे नियमितपणे हनुमान चालीसाचे पाठ करणे.

हे आहेत 5 क्लेश - अविद्या म्हणजे अज्ञान, अपमान, द्वेष, राग आणि मृत्यूची भीती.
हे आहेत 6 विकार - वाईट सवयी म्हणजे वासना, क्रोध, लोभ, मद (नशा) मत्सर, मोह हे सहा विकार आहेत.
हे सर्व क्लेश आणि विकार आपल्याला लक्ष्यापासून आणि योग्य मार्गावरून दूर करतात. यापासून दूर राहण्यासाठी नियमितपणे हनुमान चालीसाचे पाठ करावेत.

जर तुम्हाला दररोज हनुमान चालीसाचे पाठ करणे शक्य नसेल तर आठवड्यातील दोन दिवस मंगळवार आणि शनिवारी पाठ करू शकता. जर आठवड्यातील दोन दिवसही शक्य नसेल तर एक दिवस तरी अवश्य पाठ करा. एक दिवसही पाठ करणे शक्य नसेल तर शांत एकाग्र मनाने हनुमानाचे स्मरण करून हनुमान चालीसातील कोणत्याही एका चौपाईचा (श्लोक)जप केल्यास हनुमानाची कृपा प्राप्त होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या चौपाईने कोणकोणते लाभ प्राप्त होऊ शकतात...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)