शास्त्रानुसार वाढदिवस साजरा करणे म्हणजे वर्धापन संस्कार करणे असा आहे. जन्म तिथीला प्रत्येक व्यक्ती वर्धापन संस्कार करू शकत नाहीत. यामुळे आज आम्ही तुम्हाला असे 5 काम सांगत आहोत. जे केल्यानंतर तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी शरीर प्राप्त होऊ शकते.
1. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी लवकर 4 ते 5 या वेळेदरम्यान उठावे. हा ब्रह्म मुहूर्त आहे. यावेळी उठल्याने आयुष्य वाढते. मनातल्या मनात श्रीगणेशाचे स्मरण करून डोळे उघडावीत. तिळाचे उटणे लावून स्नान करावे. प्रथम पूजनीय देवता श्रीगणेशाची पूजा करावी. दुर्वा अर्पण करून मोदकाचा नैवेद्य दाखवावा.