आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसर्‍यासाठी नेहमी करा स्वहिताचा त्याग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक वर्षानुवर्षांच्या ऋषी-मुनींच्या अनुभवाआधारे एक गोष्ट स्पष्ट आहे की, मानव आत्म्याची व्यक्तिगत अशांती ही समाजातील सामूहिक अशांततेचे कारण आहे. काम, क्रोध, लोभ, मोह आणि अशुद्ध अहंकार या पाच विकारांच्या आहारी जाऊन मनुष्य इतक्या खालच्या थराला गेला आहे की, तो प्रत्येक वेळी काही ना काही अकल्याणकारी कार्य करतच असतो. परंतु, विधिलिखित आज संपूर्ण संसार याच पाच विकारांच्या गुंत्यात अडकून पडला आहे. यालाच आपले सुख, समाधान समजत आहे. दुसर्‍याचे वाईट करण्याची इच्छा मनुष्याला पळवत आहे.

जरा विचार करा, जर का आपण सगळा वेळ दुसर्‍यांचे वाईट करण्यात व्यर्थ केला तर जगात कोणाचेच चांगले होणार नाही. या समस्येवर एक उपाय म्हणून आपण समाजात अशा प्रकारचे विचार पसरवायला हवेत की, जेणेकरून मनुष्याच्या क्रूर आणि हिंसक वृत्तीचे परिवर्तन होऊन ती कल्याणकारी होईल. हे घडवून आणण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची व्यक्तिगत आहे. आज जगाला माझ्या छोट्याशा कल्याणकारी दृष्टिकोनाची अधिक आवश्यकता आहे. असे विचार वातावरणात मिसळण्याची गरज आहे. नंतर हेच विचार आपल्या कल्याणाचे निमित्त होतील. लक्षात असू द्या दीर्घकाळच्या आपल्या सद्व्यवहाराद्वारे आपल्याला सद‌्गुणांची प्राप्ती होते. ज्याचा उपयोग एक शांत आणि सुखी समाज निर्माण करण्यासाठी होतो. म्हणूनच शुभभावना आणि कामना याद्वारे कर्म करत राहिलो तर त्याचे फळ आपाेआप आपल्याला मिळत राहील.