आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेकवेळा काही लोक जीवनात आलेल्या छोट्या-छोट्या अडचणींमुळे स्वतःच्या नशिबाला दोष देत असतात. सामान्यतः एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही की लगेच आपण नशिबाला दोष देतो. परंतु छोट्या-छोट्या अडचणींमुळे नशिबाला दोष देणे योग्य नाही. आचार्य चाणक्यांनी पुरुषांसाठी अशा तीन परिस्थिती सांगितल्या आहेत, जेव्हा निश्चितच असे वाटू लागते की व्यक्तीचे नशीब खराब आहे.
आचार्य चाणक्य सांगतात की...
वृद्धकाले मृता भार्या बन्धुहस्ते गतं धनम्।
भोजनं च पराधीनं त्रय: पुंसां विडम्बना:।।
या श्लोकामध्ये आचार्य सांगतात की, एखाद्या पुरुषाची पत्नी तरुणपणात देवाघरी गेली तर तो दुसरे लग्न करू शकतो, परंतु वृद्धावस्थेत पत्नी नसणे हे मोठे दुर्भाग्य आहे.
कोणत्याही व्यक्तीसाठी म्हातारपणात पत्नी जवळ असणे खूप आवश्यक आहे. म्हातारपणात पत्नी मेल्यास तो एकटा व्यक्ती योग्य पद्धतीने जीवन जगू शकत नाही. याच कारणामुळे वृद्धावस्थेत पत्नी जवळ नसणे ही मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. ही नीती ठीक अशाच प्रकारे स्त्रियांना लागू पडते.
पुढे जाणून घ्या, इतर दोन गोष्टी ज्या व्यक्तीच्या दुर्भाग्यकडे इशारा करतात...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.