आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसाने तीन गोष्टींबाबत कधीच संतुष्ट राहू नये, सुखी आयुष्यासाठी वाचा या खास नीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपणच भविष्यात अडचणीत येतो. सुखी आणि आनंदी जीवनासाठी काही खास गोष्टींचा अवलंब केल्यास कधीही दुःख पदरी पडणार नाही. आचार्य चाणक्यांनी सुखी जीवनासाठी काही खास नीती सांगितल्या आहेत. त्यामधील काही निवडक नीती आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

काय आहे चाणक्य नीती ?
चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते. राजनीती आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खासकरून यात मार्गदर्शन आहे. याशिवाय चाणक्यांनी लिहिलेला अर्थशास्त्रावरील ग्रंथही प्रसिद्ध आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ आजही अभ्यासला जातो.

पुढे वाचा या चाणक्य नीतीच्या खास गोष्टी...