आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य नीती - अशा स्त्रियांचा सर्वात मोठा शत्रू त्यांचा पतीच असतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती-पत्नीमधील नातं योग्य ताळमेळ आणि एकमेकांना समजून घेण्याच्या क्षमतेवरच आनंदी राहू शकते. ज्या घरामध्ये या गोष्टींची कमतरता असते, तेथे अशांती आणि दुःखाचे वातावरण निर्माण होते. जेव्हा अशांती आणि मानसिक तणाव वाढतो, तेव्हा पती-पत्नी एकमेकाला शत्रू समजू लागतात. आचार्य चाणक्यांनी पती-पत्नीसाठी एक नीती सांगितली आहे. या नीतीमध्ये केव्हा एखाद्या पत्नीचा पती तिच्यासाठी सर्वात मोठा शत्रू बनतो हे सांगण्यात आले आहे...
चाणक्य सांगतात की...
लुब्धानां याचक: शत्रु: मूर्खाणां बोधको रिपु:।
जारस्त्रीणां पति: शत्रुश्चौराणां चंद्रमा: रिपु:।।

या श्लोकामध्ये चाणक्यांनी सांगितले आहे की, जर एखादी स्त्री वाईट चारित्र्याची, अधार्मिक कर्म करणारी, परपुरुषाकडे आकर्षित होणारी असेल तर पतीच तिचा सर्वात मोठा शत्रू असतो. अधार्मिक कर्म करणार्‍या पत्नीला पती अशा कामांपासून अडवतो, त्यामुळे ती त्याला शत्रू समजू लागते.

जर पती किंवा पत्नी दोघांमधील कोणी एक वाईट गोष्टीच्या आहारी गेला असेल तर दुसर्यालाही त्याच्या वाईट परिणामांना समोरे जावे लागते. पत्नीच्या चुकीची शिक्षा पतीला भोगावी लागते आणि पतीच्या चुकीच्या शिक्षा पत्नीला. यामुळे वैवाहिक जीवनात पती आणि पत्नीने समजुतदारपणे जीवन व्यतीत करावे.

पुढे जाणून घ्या, या श्लोकाचा पूर्ण अर्थ...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)