आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य नीती : या तीन कामांमुळे तुम्ही संकटात सापडू शकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूचा दिवस आणि वेळ माहिती करून घेणे अशक्य गोष्ट आहे. शास्त्रानुसार मृत्यूची वेळ त्याच दिवशी निर्धारित होते, ज्या दिवशी व्यक्तीचा जन्म झाला. काही लोकांचा मृत्यू अचानक होतो. या संदर्भात आचार्य चाणक्यांनी काही कामे अशी सांगितली आहेत, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू लवकर किंवा अचानक होऊ शकतो.

आचार्य सांगतात की...
आत्पद्वेषाद् भवेन्मृत्यु: परद्वेषाद् धनक्षय:।
राजद्वेषाद् भवेन्नाशो ब्रह्मद्वेषाद कुलक्षय:।।

या श्लोकामध्ये आचार्यांनी सांगितले आहे, की व्यक्तीने नेहमी अशा कामांपासून दूर राहावे ज्यामुळे मृत्यूचे संकट येऊ शकते.

आचार्य चाणक्यानुसार आपण कधीही एकदा राजा किंवा शासन-प्रशासनाशी वैर ठेवू नये. जे लोक राजाला विरोध करतात, त्याचा जीव संकटात सापडू शकतो. ज्या क्षणी राजाला विरोध केला जातो, त्याच क्षणी व्यक्तीच्या जीवनावर संकट येते. सध्याच्या काळामध्ये एखादा मोठा अधिकारी किंवा मोठ्या व्यक्तीशी शत्रुत्व होणे निश्चितच अडचणीचे कारण बनते. जोपर्यंत आपण मजबूत स्थितीमध्ये येत नाहीत, तोपर्यंत या लोकांशी वैर घेऊ नये. योग्य वेळेची वाट पाहावी.

पुढे जाणून घ्या, या चाणक्य नीतीशी संबंधित काही खास गोष्टी...