आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती किंवा पत्नी चूक करत असेल तर लक्षात ठेवा ही चाणक्य नीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः असे मानले जाते की, जो व्यक्ती चुकीचे काम करतो त्यालाच त्या कमाचे वाईट फळ भोगावे लागते. हे गोष्ट खरी आहे, परंतु काही परिस्थितींमध्ये चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीसोबतच इतरांनाही त्या कामाची शिक्षा भोगावी लागते. आचार्य चाणक्यांनी एका नीतीमध्ये सांगितले आहे की, कोणत्या कारणांमुळे आपल्याला इतरांच्या चुकीमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो...

आचार्य चाणक्य सांगतात की...
राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञ: पापं पुरोहित:।
भर्ता च स्त्रीकृतं पापं शिष्यपापं गुरुस्तथा।।

चाणक्यांनी या श्लोकामध्ये सांगितले आहे की, कोणत्या व्यक्तीच्या पापाचे फळ कोणाला भोगावे लागते.

जर जोडीदार चुकीचे काम करत असेल तर...
आचार्य चाणक्य सांगतात की, लग्नानंतर जर एखादी पत्नी चुकीचे काम करते, सासरी सर्वांकडे दुर्लक्ष करते, आपल्या कर्तव्यांचे पालन योग्य पद्धतीने करत नसेल तर अशा कर्मांची शिक्षा पतीला भोगावी लागते. ठीक अशाचप्रकारे जर एखादा पती चुकीचे काम करत असेल तर त्याचे फळ पत्नीला भोगावे लागते. त्यामुळे पती आणि पत्नी, दोघांनीही एकमेकांचे उत्तम सल्लागार व्हावे. जोडीदाराला चुकीचे काम करण्यापासून दूर ठेवावे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या श्लोकाचा पूर्ण अर्थ...