सामान्यतः असे मानले जाते की, ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्याने किंवा शिकवल्याने कोणताही व्यक्ती विद्वान होऊ शकतो, परंतु असे घडेलच यामध्ये शंका आहे. आचार्य चाणक्यांनी या संदर्भात एका नीतीमध्ये तीन अशा लोकांबद्दल सांगितले आहे, ज्यांचे भले करून देखील आपल्याला दुःख मिळण्याची शक्यता राहते. चाणक्य नीतीनुसार या तीन लोकांपासून दूर राहण्यातच आपले हित आहे.
मूर्खशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च।
दु:खिते सम्प्रयोगेण पण्डितोऽप्यवसीदति।।
हा चाणक्य नितीमधील पहिल्या अध्यायातील चौथा श्लोक आहे. यामध्ये चाणक्यांनी सांगितले आहे की, काही लोकांचे भले करूनदेखील दुःखच प्राप्त होते. पुढे जाणून घ्या, कोणकोण आहेत हे लोक...