आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य म्हणतात, या 4 गोष्टी चुकूनही कुणाला सांगू नका, येतील गंभीर संकटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आचार्य चाणक्य यांचे प्रतिकात्मक चित्र)

उजैन- यशस्वी आणि सुखी जीवनाचे अनेक सूत्र आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नितींमध्ये दडले आहेत. चाणक्य नितींचे मनापासून पालन केले तर कोणताही मनुष्य निश्चितच संकटांपासून दूर राहू शकतो. कळत-नकळत आपण काही गोष्टी इतरांना सांगतो. त्याचा आपल्या भविष्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. आयुष्यभर गुपित ठेवाव्यात, अशा चार गोष्टी चाणक्य यांनी सांगितलेल्या आहेत. इतरांना या गोष्टी सांगितल्या तर भविष्यात आपल्यावर गंभीर संकटे येऊ शकतात, असे चाणक्य सांगतात.
आचार्य सांगतात की-
अर्थनाशं मनस्तापं गृहिणीचरितानि च।
नीचवाक्यं चाऽपमानं मतिमान्न प्रकाशयेत्।।
हा चाणक्य नितींच्या सप्तम अध्यायाचा पहिला श्लोक आहे. पैशांच्या हाणीसंदर्भातील कोणतीही गोष्ट इतरांना सांगू नये. आपले आर्थिक नुकसान झाले आहे किंवा पैशांची कमतरता या समस्येला आपण सामोरे जात आहोत, असे इतरांना सांगितले तर इतर आपल्यावर आर्थिक बाबींमध्ये विश्वास ठेवणार नाहीत. समाजात गरीब व्यक्तीला पैसे सहज मिळत नाहीत. त्यामुळे ही गोष्ट कुणालाही सांगू नये.
पुढील स्लाईडवर वाचा, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या इतर 3 गोष्टी... यामुळे होईल तुम्हाला फायदा...