आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या स्त्री किंवा पुरुषाची पारख करण्यासाठी लक्षात ठेवा ही चाणक्य नीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वांना हे जाणून घेण्याची इच्छा असते की, आपल्या जवळपास राहणारे लोक कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे? कोणत्या व्यक्तीची पारख करण्यासाठी आचार्य चाणक्यांनी एक अचूक नीती सांगितली आहे. या नीतीमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टींवरून एखाद्या स्त्री किंवा पुरुषाची पारख केल्यास त्या व्यक्तीशी संबंधित सर्व योग्य माहिती प्राप्त केली जाऊ शकते.

आचार्य चाणक्य सांगतात की...
यथा चतुर्भि: कनकं परीक्ष्यते निघर्षणं छेदनतापताडनै:।
तथा चतुर्भि: पुरुषं परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा।।

या श्लोकामध्ये आचार्य चाणक्य सांगतात की, सोन्याची पारख करण्यासाठी चार गोष्टी करणे आवश्यक आहेत. सोन्याला रगडून, कापून आगीमध्ये गरम करून आणि दाबून पाहिले पाहिजे. या चार गोष्टी केल्यानंतरच शुद्ध सोन्याची पारख केली जाऊ शकते. जर सोन्यामध्ये भेसळ किंवा कमतरता असेल तर या कामांमुळे ती समोर येईल.

पुढील स्लाईड्समध्ये श्लोकाच्या उर्वरित अर्थावरून जाणून घ्या, एखाद्या व्यक्तीला कशाप्रकारे पारखावे....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)