आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Remember This Chanakya Niti To Avoid Problems Of Life

भविष्यातील अडचणींपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा ही चाणक्य नीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख आणि दुःख येत जात असतात. असे मानले जाते की, कोणताही व्यक्ती सुखाला जाण्यापासून आणि दुःखाला येण्यापासून थांबवू शकत नाही. दुःखाला रोखण्यासाठी व्यक्तीने पूर्वीपासूनच चांगले कर्म करणे आवश्यक आहे, ज्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होणार नाहीत. आचार्य चाणक्यांनी एक नीतीमध्ये सांगितले आहे की, व्यक्तीने भविष्यातील अडचणींपासून दूर राहण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे आणि कोणकोणत्या गोष्टी व्यक्तीला दुःख प्रदान करतात.

आचार्य सांगतात की....
कष्टं च खलु मूर्खत्वं कष्टं च खलु यौवनम्।
कष्टात् कष्टतरं चैव परगेहे निवासनम्।।

आचार्य चाणक्यांनी या श्लोकामध्ये सांगितले आहे की, कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात मोठे दुःख मूर्ख असणे हे आहे. जर एखादा व्यक्ती मूर्ख असेल तर त्याला जीवनात कधीच सुख प्राप्त होत नाही. अशा व्यक्तीला जीवनातील प्रत्येक वळणावर दुःख आणि अपमानाला सामोरे जावे लागते. बुद्धीच्या अभावामध्ये व्यक्ती उन्नती करू शकत नाही. यामुळे अज्ञानाला दूर करण्याचा प्रयत्न करावा आणि ज्ञानाचा योग्य दिशेसाठी वापर करावा.

पुढे जाणून घ्या, या श्लोकाचा पूर्ण अर्थ....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)