आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य नीती : मूर्ख व्यक्ती आणि हे 6 जण झोपलेले असतील तर यांना उठवू नये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आचार्य चाणक्यांच्या नीतींचे पालन केल्यास व्यक्ती विविध प्रकारच्या अडचणींपासून दूर राहू शकतो. चाणक्यांना त्यांच्या नीतींमुळे आजही सर्वोच्च स्थान प्राप्त आहे. त्यांनी आपल्या नीतीच्या जोरावर बालक चंद्रगुप्तला भारताचा सम्राट बनवले आणि विदेश शासक सिकंदरच्या आक्रमणापासून भारताचे रक्षण केले. चाणक्यांनी एका नीतीद्वारे सांगितले आहे की, मूर्ख व्यक्तीपासून कशाप्रकारे दूर राहावे ज्यामुळे आपण अडचणींत सापडणार नाहीत.

आचार्य चाणक्यांनी प्रत्येक स्थितीसाठी वेगवेगळी नीती सांगितली आहे. एखादा व्यक्ती झोपला असेल तर त्या संदर्भातही चाणक्यांनी नीती सांगितली आहे.

आचार्य सांगतात की....
अहिं नृपं च शार्दूलं बरटिं बालकं तथा।
परश्वानं च मूर्खं च सप्त सुप्तान्न बोधयेत्।।

या श्लोकामध्ये आचार्य सांगतात की, जर एखादा मूर्ख व्यक्ती झोपला असेल तर त्याला झोपू द्यावे, उठवण्याच्या प्रयत्नही करू नये. जर मूर्ख व्यक्ती जागा झाला तर आपल्या अडचणी वाढू शकतात. बुद्धिहीन व्यक्ती व्यर्थ बडबड करून आपला वेळ नष्ट करतो आणि हे लोक कधीकधी असे काम करतात ज्यामुळे आपण संकटात पडू शकतो. त्यामुळे अशा लोकांना कधीही झोपेतून उठवू नये.

पुढे जाणून घ्या, या श्लोकाचा पूर्ण अर्थ आणि एका इतर नीतीनुसार कोणत्या सात लोकांना झोपेतून त्वरित जागे करावे...