आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chanakya Niti We Should remember This Tips For Good Happy Life

चाणक्य नीती : या तीन लोकांचे भले करूनही तुम्हाला दुःखच मिळेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः असे मानले जाते की, ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्याने किंवा शिकवल्याने कोणताही व्यक्ती विद्वान होऊ शकतो, परंतु असे घडेलच यामध्ये शंका आहे. आचार्य चाणक्यांनी या संदर्भात एका नीतीमध्ये तीन अशा लोकांबद्दल सांगितले आहे, ज्यांचे भले करून देखील आपल्याला दुःख मिळण्याची शक्यता राहते. चाणक्य नीतीनुसार या तीन लोकांपासून दूर राहण्यातच आपले हित आहे.

मूर्खशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च।
दु:खिते सम्प्रयोगेण पण्डितोऽप्यवसीदति।।

हा चाणक्य नितीमधील पहिल्या अध्यायातील चौथा श्लोक आहे. यामध्ये चाणक्यांनी सांगितले आहे की, काही लोकांचे भले करूनदेखील दुःखच प्राप्त होते. येथे जाणून घ्या, कोणकोण आहेत हे लोक...

मूर्खाशिष्योपदेशेन म्हणजे मूर्ख शिष्याला उपदेश देणे
एखाद्या मूर्ख व्यक्तीला उपदेश देऊ नये. मूर्ख व्यक्ती नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी चुकीचा तर्क-वितरक करत राहतो. यांना समजून सांगणे खूप कठीण काम आहे. एखादा श्रेष्ठ व्यक्तीसुद्धा एखाद्या मुर्खाला विद्वान बनवू शकत नाही. यामुळे मूर्ख लोकांसमोर ज्ञानाच्या गोष्टी करू नयेत, अन्यथा आपल्यालाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.

पुढे जाणून घ्या, कोणत्या स्त्रीचे भले करूनही दुःख प्राप्त होते...