आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गमावण्याची भीती आपल्या मनातून दूर करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण जे आणि जसे काही आहोत, त्यात आपण जर आनंद घेत नसू तर गमावण्यातील वेदना आपल्या वाट्याला येते. आपण माणसे मरण्याची चिंता करीत असतो, कारण आपण जगतच नाही. तीच तर गोम आहे. आपण मरत असतो कारण आपण जगतच नसतो. ‘जे आहे’ त्या जीवनात रस न घेणे हे गमावण्याच्या भीतीचे मोठे लक्षण आहे.

दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास आपण आत्ताच्या क्षणातील सुगंध टिपत नसतो. वर्तमानातील क्षण संपूर्णपणे जगणे महत्त्वाचे आहे. अर्थात परिवर्तनाला पूर्णविराम कधी नसतोच. परंतु, एखाद्या दीर्घ कादंबरीत एखादे पात्र ‘कोमा’मध्ये असावे तसे असते. एकूणच आपल्याकडे जे काही आहे त्याकडे दुर्लक्ष करीत, बहुतेक लोकं ही त्या इच्छा-आकांक्षांच्या वेदनेतच लटकत राहतात. लक्षात घ्या, आत्ता तुम्ही जे काही आहात ती ईश्वराचीच देणगी आहे आणि त्याची इच्छा आहे.

म्हणूनच दिवा स्वप्नात न अडकता आपण जीवनात प्रवाहित राहिले पाहिजे. ‘क्षणस्थ’ वृत्तीने जगायला हवे. खरे तर आयुष्य ही एक दैवी देणगी-संधी असते की जी सांगते की, या स्वप्नांच्या पलीकडे जा आणि अक्रिय सावधानतेने वास्तवाचे भान ठेवा. एका खोट्या-भ्रमजन्य प्रभाव विश्वात वावरणे आणि प्रत्यक्ष वास्तव या दोन्ही गोष्टी खूपच वेगळ्या आहेत. वास्तवाचा झालेला स्पर्श आपल्या मनाला संवेदनशील बनवीत असतो. सत्याशी-वास्तवाशी सखोल बांधिलकीने व संवेदनशीलतेने जुडलेले असणे महत्त्वाचे आहे.

दैवी बीज बनण्याचा प्रयत्न करा की, त्या करुणेतून एका नव्या ऊर्जेचा वृक्ष होईल. सगळ्या भ्रमाला-खोटेपणाला नाकारत तुमचे आतले दरवाजे उघडा. एक सौंदर्यशील तरुण मुलींच्या घोळक्यात एका बोटीत बसलेला असतो. दुसर्‍या बोटीतील त्याचा मित्र त्याला म्हणतो, ‘या तरुणींची सोबत आणि संवाद यातला आनंद वेच. पण सावधान राहा. कारण त्यांना त्रास देणार्‍या व्यक्तीला त्या बोटीबाहेर फेकू शकतात.’

पवित्र आध्यात्मिक बोध : तुम्ही आज जे काही आहात, ती ईश्वराचीच इच्छा-देणगी आहे.