आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वत:ला रिक्त करून प्रज्ञाशील बना..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही पुरेसे कणखर व परिपक्व नाहीत, याचे कारण म्हणजे तुम्ही अनेकदा निराश होता, चिडता आणि कमजोर लोकांवर तोंडसुख घेत, त्यांच्यावर आपला सगळा राग काढता. बरोबर आहे ना? तुमच्यातील उणिवा व अवगुण तुम्हाला प्रकाशमान करता आला पाहिजे. इतकेच नव्हे, तर सार्मथ्याकडे जाणारा रस्ता तुम्हाला प्रकाशमान करता आला पाहिजे. साध्या, सोप्या जीवनासाठी नव्हे, तर सार्मथ्यशाली आणि प्रेरणादायी आयुष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. सार्मथ्याकडे जाणार्‍या तरुण प्रवाशाची पहिली पायरी कोणती असावी? प्रथम हे समजून घ्या की, सर्वसाधारणपणे चार प्रकारची ऊर्जा वा चैतन्ये आपल्या आतच बंदिस्त असतात. हे चैतन्य आपल्याला बाहेर आविष्कृत करता आले पाहिजे. ती चैतन्ये पुढीलप्रमाणे..

-शारीरिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक चैतन्य
एका सखोल-चांगल्या सरावानिशी योग, प्राणायाम तसेच श्वासोच्छ्वासाचे आयाम, आपल्याला करता आले पाहिजेत. जेणेकरून आपल्या आतील शारीरिक चैतन्य मुक्त होऊ शकेल. तसेच संवेदनशील योग्य भावभावना, प्रेम व करुणा यासह भावनिक चैतन्यमयतेला मोकळे करा. मौलिक मूल्ये ओळखा आणि ती प्रत्यक्ष जीवनात उतरवा. ही तिन्ही चैतन्ये जेव्हा मोकळी होतील तेव्हा ती आध्यात्मिक ऊर्जेलाही बंदिस्ततेतून मुक्त करतील. या चारही प्रकारच्या चैतन्यमयतेसह कुठल्याही तरुणाचे जीवन सार्मथ्यशाली तर होईलच; पण असा तरुण मोठे वैभवशाली व सर्वाधिक यशस्वी जीवन जगू शकेल. मग तुम्ही तुमच्यातील अवगुणांवर सहज मात करू शकाल. खरे तर आमची जीवनविषयक मते वा विचारसरणी ही संकुचित आहे. पण, आता तुम्ही व्यक्त केलेल्या चैतन्याच्या दिशेने आजचे तरुण मुक्त होतील? यावर चिंतन करा.

एक जण मार्शल आर्ट्सचा बादशहा ‘ब्रुस ली’कडे गेला आणि त्याने त्याला मार्शल आर्ट्स शिकवण्याची विनंती केली. ‘ब्रुस ली’ने विचारले की ‘तुला यापूर्वीचा मार्शल आर्ट्सचा काही अनुभव आहे का?’ त्याने उत्तर दिले की, मला ‘ब्लॅक बेल्ट’ मिळाला आहे. मग त्या माणसाने ‘ब्रुस ली’ला मार्शल आर्ट्सच्या काही कसरती करून दाखवल्या. ते पाहून ‘ब्रुस ली’ त्याला म्हणाला, ‘तुला जर मार्शल आर्ट्स शिकण्यात खरोखरच रस असेल तर तू आतापर्यंत जे काही शिकला आहेस ते तुला प्रथम डोक्यातून काढावे लागेल आणि कोर्‍या पाटीसह माझ्याकडे यावे लागेल.’ त्या खेळाडूला ते ऐकून धक्काच बसला आणि त्याने त्याचे कारण ‘ब्रुस ली’ला विचारले. ‘ब्रुस ली’ने त्यावर त्याला एक गोष्ट सांगितली. वादविवादात जिंकण्यासाठी एक माणूस झेन गुरूंकडे गेला. त्या गुरूंनी त्याला चहाचा आग्रह केला आणि त्याच्या कपात ते चहा ओतू लागले. कप भरूनही ते गुरू चहा ओततच होते. त्यांनी त्या गुरूंना विचारले की ‘तुम्ही हे काय करता आहात?’ ते म्हणाले, ‘तू या चहाच्या कपाप्रमाणे अगोदरच भरलेला आहेस. प्रथम तू तुझ्या मन-बुद्धीचा कप रिकामा कर आणि मग मी तुला काही सांगू शकेन, शिकवू शकेन. दुसर्‍या भाषेत सांगायचे तर भरलेल्या कपात आणखी चहा ओतणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.’ प्रथम तुम्ही स्वत:ला निदरेष रिक्त करा आणि मगच त्या अवकाशात तुम्ही नवे काही शिकून प्रज्ञाशील बनाल. या निदरेष रिक्ततेसाठी प्रबळ आंतरिक इच्छाशक्ती हवी. जेव्हा तुम्हाला काही काम नसेल, तेव्हा विचारांच्या हालचालींशिवाय राहण्यास शिका.

विचार येतील आणि जातील. पण, तुम्ही त्या विचारांकडे अक्रिय सावधानतेने पाहा. कुठल्याही परिस्थितीत त्याच्याशी एकरूप होऊ नका. मग तुम्ही आत्मसुख व शांती यांची अनुभूती घ्याल. स्वत:ला निदरेष रिक्त करणे, विचारांच्या हालचालींशिवाय तसेच राहणे, यासाठी एका आंतरिक शिस्तीची मोठी आवश्यकता आहे. अर्थात हा आयुष्यभराचा प्रवास आहे. तुम्ही जर तुमच्या विचारांकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की विचार हे यांत्रिकतेतून घडत असतात आणि तुम्ही त्याच्या कृत्रिमतेतील घडणीला बळी पडता. त्यात परिवर्तन घडवून आणा.