सामान्यतः असे मानले जाते की, ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्याने किंवा शिकवल्याने कोणताही व्यक्ती विद्वान होऊ शकतो, परंतु असे काहीही नाही. आचार्य चाणक्यांनी या संदर्भात एक नीतीमध्ये सांगितले आहे की, एखाद्या मूर्ख व्यक्तीला उपदेश करू नये म्हणजेच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नयेत. आचार्य सांगतात की...
मूर्खशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च।
दु:खिते सम्प्रयोगेण पण्डितोऽप्यवसीदति।।
हा चाणक्य नितीमधील पहिल्या अध्यायातील चौथा श्लोक आहे. यामध्ये चाणक्यांनी सांगितले आहे की, काही लोकांचे भले करूनदेखील दुःखच प्राप्त होते. येथे जाणून घ्या, कोणकोण आहेत हे लोक...
मूर्ख व्यक्ती
एखाद्या मूर्ख व्यक्तीला उपदेश देऊ नये. मूर्ख व्यक्ती नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी चुकीचा तर्क-वितरक करत राहतो. यांना समजून सांगणे खूप कठीण काम आहे. एखादा श्रेष्ठ व्यक्तीसुद्धा एखाद्या मुर्खाला विद्वान बनवू शकत नाही. यामुळे मूर्ख लोकांसमोर ज्ञानाच्या गोष्टी करू नयेत, अन्यथा
आपल्यालाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.
पुढे जाणून घ्या, या श्लोकाचा पूर्ण अर्थ...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)