आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराधना म्हणजे सत्कर्माची दिवाळी व कुकर्माची होळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आराधना करणे म्हणजे स्तुती करणे किंवा सेवा करणे होय. आपण एखाद्या इष्टदेवतेची आराधना करतो, स्तुती करतो. मंत्र म्हणतो. त्याच्यासमोर बसून जप करतो. इत्यादी सर्व काही करतो म्हणजेच आराधना करतो. त्यातून मानसिक समाधान मिळते. अंत:करणात भक्तीचे प्रतिबिंब उमटते. सुखाचा स्पर्श होतो. दारावर मांगल्याच्या रांगोळ्या काढल्या जातात. सत्त्वाची सावली मिळते. अध्यात्माची वाट मोकळी होते. ती एक प्रकारची साधना असते. साधनेतून माणूस उत्कृष्ट प्रकारचे अनुभव घेऊ शकतो. ती मनाला पवित्र करते.

त्यामुळे घरात तेजोवलय निर्माण होऊन वातावरणनिर्मिती होते. अभ्यासाला चिंतनाची धार येते. स्मरणशक्ती वाढते. मन विशाल बनते. मनातील आकांत कमी होतो. हाती घेतलेले काम सिद्धीस जाते. निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. ब्रह्मनामाचे ऐक्य साधते. विहित कर्माचा त्याग केला जातो. अंत:करण शुद्ध होते. शुभाशुभ कल्पना नाहीशा होतात. अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होऊन आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो. मग सुखाची सकाळ होते. दिव्य तेजाचे सूर्यकिरण हळूहळू वर येतात. देहावर प्रखर तेज निर्माण होते. तेव्हा माणसातला अहंपणा पूर्ण मावळून जातो. कारण अहं अंधकार निर्माण करतो त्याला नष्ट करण्याचे काम आराधनेतून होते. आराधना ही सत्कर्माची दिवाळी आणि कुकर्माची होळी असते. मनावर होणार्‍या आघातापासून नेहमी रक्षण होते. म्हणजे संसारात एक प्रकारची नवशक्ती निर्माण होते. ती नाना प्रकारच्या विघ्नांपासून वाचविते. व्यवहारात अनेक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जातो, त्याला आराधना म्हणतात. आराधनेतून स्थगित कार्याला गती मिळते. जीवनातील सर्व संकटांचा ऱ्हास म्हणजे आराधना होय.