आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तीन गोष्टींचा कुटुंबावर निश्चितच वाईट प्रभाव पडतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहंकारापासून दूर राहा - घरामध्ये अहंकाराचा प्रवेश झाल्यानंतर कुटुंबावर व्यक्तिवाद हावी होतो.
फक्त स्वतःचा लाभ पाहू नये - कुटुंबात केवळ स्वतःचा स्वार्थ पाहू नये. कुटुंबातील इतर सदस्यांचा देखील विचार करावा.
वाईट कामापासून दूर राहा - कुटुंबाची सुखासाठी आपण काय करत आहोत? का करत आहोत? आणि याचे काय पडसाद उमटतील याचा नेहमी विचार करावा. तुम्ही कोणतेही काम करा, परंतु ते काम चुकीचे असेल तर याचे परिणाम सर्व कुटुंबाला भोगावे लागतात.

रावणाच्या आयुष्याकडे पाहून समजू शकतो या तीन गोष्टींचा प्रभाव..

अहंकार आणि क्रोधाने रावणाचा सर्वनाश तर केलाच, त्याचबरोबर संपूर्ण राक्षस कुळाला प्राणांची आहुती देऊन रावणाचा वाईट कर्मांची किंमत मोजावी लागली. शक्तीच्या अभिमानामध्ये रावणाने कधीही याचा विचार केला नाही की, त्याच्यामुळे सर्व कुळाचा विनाश होईल. त्याचा अह्कर त्याला जे करायला भाग पाडत होता, तेच कार्य रावण करत होता. याचा परिणाम काय झाला, हे आपल्या सर्वांसमोर आहेच.

जर रावणाने एक क्षणभरही स्वतःच्या कर्मांचा विचार केला असता तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला विनाशापासून दूर राहणे शक्य झाले असते. फक्त अहंकारामुळे त्याला स्वतःचे आणि कुटुंबाचे सुख कशात आहे हे समजू शकले नाही.