आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Formulas For Get Blessing Of Goddess Laxmi In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्त्रियांशी संबधित या 3 गोष्टी लक्षात ठेवल्यास पुरुषाचे जीवन सुखी होते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये कोणत्याही स्त्रीचा सन्मान आणि तिची सेवा हे महत्त्वाचे जीवन मुल्य मानले गेले आहे. धर्म प्रथांमध्ये देवीची विविध रूप असो किंवा मग संसारिक दृष्टीकोनातून आईपासून सुरु होऊन बहिणीसहित स्त्रीसोबत वेगवेगळ्या रूपातील नाते प्रत्येक व्यक्तीला स्त्रीचे महत्त्व सांगते. ग्रंथ पुराणानुसार या सृष्टीची उत्पत्ती देवीपासून झाली आहे. देवी जगदंबेशिवाय या सृष्टीची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. ठीक त्याप्रमाणेच स्त्रियांशिवाय हे जग पुढे जाण्याचा विचारही केला जाऊ शकत नाही. याच कारणामुळे नवरात्रीमध्ये कुमारिकांच्या पायांचे पूजन केले जाते. कारण यापासून लोकांनी स्त्रियांचा सन्मान करण्याचे शिकावे.

विशेषतः गृहस्थीचे केंद्र स्त्रीला मानण्यात आले आहे. देवी-देवतांचे स्मरण करतानाही राधा-कृष्ण किंवा सीता-राम यामध्ये पहिले देवीचे नाव घेतले जाते, कारण यावरून पुरुषाच्या जीवनात स्त्रीचे किती महत्त्व आहे हे समजते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले दोन सूत्र प्रत्येक व्यक्तीने विशेषतः पुरुषांनी आत्मसात करणे आवश्यक आहे. कारण यामुळे केवळ स्त्री आणि घराला नुकसानीपासून वाचवले जाऊ शकत नाही तर या दोन गोष्टींवर पुरुषाचे सुख अवलंबून आहे.

शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...
बुद्धिप्राणमनोदेहाहंकृतीन्द्रियत: पृथक्।
अद्वितीयश्चिदात्माहं शुद्ध एवेति निश्चितम्।

देवी पुराणातील या श्लोकामध्ये देवी जगदंबेने सांगितले आहे की, बुद्धी, प्राण, अहंकार आणि इंद्रीयांपासून वेगळा शुद्ध आणि अद्वितीय आत्मा मीच आहे. स्त्रियांना देवीचा अंश मानण्यात आले आहे. यामुळे स्त्रियांचा सन्मान केल्यास देवी जगदंबा प्रसन्न होते. घरातील स्त्रियांना प्रसन्न ठेवल्यास त्या प्रत्येक प्रकारचे सुख प्रदान करतात.

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, 2 खास गोष्टी, ज्या पत्येक पुरुषाने स्त्रीच्या सुखासाठी अंगीकृत कराव्यात....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)