आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Utsav 2015 Why Lord Ganesh Is Life Management Master Teach These Things

का आहेत श्रीगणेश लाइफ मॅनेजमेंटचे गुरु? तुम्हीही वाचा आणि मुलांनाही सांगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणपती बाप्पा सर्वांचे आराध्य दैवत. संकटांचा नाश करणारा विघ्नहर्ता, कला आणि विद्येची देवता, नव्या कार्याची प्रेरणा असणारी देवता अशा सर्वांच्या आवडीच्या गणेशाचा उत्सव सुरू आहे. गणेशाला आपण एक उत्कृष्ट व्यवस्थापन गुरू म्हणू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या की बाप्पा आपल्या आयुष्याचे आणि कामाचे व्यवस्थापन करण्यात कशी मदत करू शकतात.

जेव्हा जेव्हा व्यक्ती संकटात किंवा अडचणीत सापडतो. त्यावेळी आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाचा धावा करतो. परंतु संकटांपासून दूर राहण्यासाठी म्हणा किंवा यश मिळवण्यासाठी बाप्पा नेहमीच आपल्याला सूचक संदेश देत असतो. कामाचे ठिकाण आणि घरातील व्यवस्थापन करताना असे प्रसंग कायम येतात. अशावेळी बाप्पाकडून अनेक गोष्टी शिकता येतील. आपल्या संस्कृतीच्या सुरुवातीपासून प्रतिके आणि चिन्हे ही संवाद साधण्याची साधने आहेत. अनेक प्रतिके वेगवेगळे संदेश देखील देत असतात. गणेशाचे रूप आणि त्याचे विविध अंग यांचे देखील अनोखे महत्त्व आहे. गणेशाची चिन्हे आपल्याला व्यवस्थापन कौशल्याची प्रेरणा मिळण्यासाठी मदतीचे ठरू शकतात.

मोठे शिर : मोठा विचार, मोठे ध्येय
संकटावेळी आपली बुद्धी, हुशारी आणि मोठय़ा विचारांचा वापर करा हे गजराजाचे शिर दर्शवतो. जो व्यक्ती/ व्यवस्थापक मोठा विचार करतो, तो संस्थेने ठरवलेली लक्ष्य सहज प्राप्त करतो. परंतु ज्याचे विचार संकुचित असतात तो कधीच निर्धारित ध्येय साध्य करू शकत नाही.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, श्रीगणेशाशी संबंधित काही खास गोष्टी...