आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे करतात अशा लोकांसोबत मैत्री, त्यांना भांडण केल्यानंतरही होतो फायदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीच्या स्वभाव आणि वागणुकीमध्ये काही चांगले गुण आणि दोष आढळून येतात, परंतु घरातील वडीलधारी मंडळी वारंवार सांगत असतात की, संगत मनुष्याचे भविष्य बनवू शकते तसेच बिघडवू शकते. जर संतांची संगत लाभली तर दुर्जन व्यक्तीसुद्धा योग्य मार्गावर चालू लागतो. याउलट वाईट संगत चांगल्या व्यक्तीलासुद्धा राक्षस बनवते, म्हणजे योग्य काय अयोग्य काय या विचारांपासून दूर नेते.

जीवनातील अशा नकारात्मक दशेपासून दूर राहण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी धर्मग्रंथांमध्ये लिहिण्यात आलेल्या गोष्टींचा अवलंब केल्यास जीवनातील प्रत्येक अडचणीपासून आपण दूर राहू शकतो.

गरुड पुराणामध्ये लिहिण्यात आले आहे की...
सद्भिरासीत सततं सद्भि: कुर्वीत संगतिम्।
सद्भिर्विवाद मैत्रीं च नासद्भि: किंचिदाचरेत्।।
पण्डितैश्च विनीतैश्च धर्मज्ञै: सत्यवादिभि:।
बन्धनस्थोपि तिष्ठेच्च न तु राज्ये खलै: सह।।
- नेहमी सज्जन म्हणजे गुणी, ज्ञानी, दक्ष व सरळ स्वभाव असणाऱ्या लोकांच्या संगतीमध्ये राहावे. कारण अशा संगतीमुळे तुम्ही उर्जावान राहून दिशाहीन होण्यापासून दूर राहता.

- मैत्री व भांडणही सज्जनांसोबत करावे, कारण त्यांच्यासोबत वाद-विवाद, चर्चा करतानासुद्धा ज्ञानाच्या अनेक गोष्टी समजतात.

- विद्वान म्हणजे दक्ष, विनम्र, धर्माबद्दल आस्था असणाऱ्या, मन, वचन व कर्माने प्रामाणिक व्यक्तीसोबत राहणे चुकीचे ठरणार नाही. कारण अशा संगतीमुळे यश, लक्ष्मी व यश प्राप्त होते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या लोकांसोबत करू नये मैत्री....