आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुआयामी ‘शक्ती’च्या माध्यमातून गुरू माँ यांचा संदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वी लोकांत ज्या-ज्या वेळी अधर्म वाढून पाप, वासना आणि दुष्ट भावनांनी प्रेरित झालेला समाज धर्माची हानी करेल, त्या-त्या वेळी परमात्म्याचे ईश्वरी अंश वेगवेगळ्या स्वरूपात पृथ्वीवर येऊन वसुंधरेचे परिपालन करील, असे भगवंत गीतेतून सांगत असतात. ईश्वराच्या अशा अंशांचा दिव्य संदेश पोहोचवण्याचे काम शक्तिरूपिणी म्हणजे गुरू माँ करत आहेत. बहुआयामी ‘शक्ती’च्या माध्यमातून गुरू माँ स्त्री सक्षमीकरणाचे कार्य त्या करीत आहेत.

गुरू माँ यांचा जन्म 8 एप्रिल 1966 रोजी अमृतसर येथे झाला. खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांनी वेदाध्यायन केले. त्यांच्या वयाचे युवा-युवती गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेत असताना समाजाला जागृत करण्याची कला आत्मसात करण्याचे प्रशिक्षण गुरू माँ यांनी घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी आत्मबोध आणि सोळाव्या वर्षी ध्यानधारणेचे महत्त्व ओळखून त्यांनी त्या मार्गाचा ध्यास धरला. त्या आधुनिक काळातील क्रांतिकारी संत आहेत. गंगाकिनारी हृषीकेश येथे मध्यवर्ती केंद्र उभारून त्यांनी आध्यात्मिक आणि सामाजिक उत्थानाचे कार्य सुरू केले.

गुरू माँ म्हणतात, भारतातील स्त्रिया आणि मुली कमजोर आणि परावलंबी असाव्यात हे मला मान्य नाही. त्यांना अधिकारसंपन्न बनवले पाहिजे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्यांचे सशक्तीकरण केले पाहिजे. स्त्रिया बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर असतील तर दुष्प्रवृत्त लोक त्यांचे शोषण करतील. त्यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होईल. मात्र, प्रत्येक महिला ही शक्ती आहे. जीवनदायिनी आहे. या स्त्रीशक्तीने आजपर्यंत अनेक संत, फकीर, अवतारी पुरुषांना जन्म दिला आहे. स्त्री आपल्या शरीराद्वारा अन्य शरीराला जन्म देऊ शकते. त्यामुळे पुरुष कधीच स्त्रीशक्तीशी, तिच्या क्षमतेशी स्पर्धा करू शकत नाही.