आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हीसुद्धा आवडत्या वस्तूची किंमत पहिले पाहात असाल तर लक्षात ठेवा या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका सायंकाळी माझी पत्नी सायली आणि मी अँटिक सिरॅमिक कलाकृतींची खरेदी करून फेरफटका मारत होतो. एका उड्डाणपुलाच्या पायर्यावर सायलीची एक पायरीवरील नजर चुकली, तिचा तोल गेला आणि आम्ही खरेदी केलेल्या जवळपास सर्वच वस्तू इतस्तत: पसरल्या. मी सायलीकडे पाहून म्हणालो,'काळजी घे, काही तरी फुटून जाईल.' ती तत्काळ उत्तरली,'नक्कीच, मी काळजी घेणार आहे. नाही तर तू दहा डॉलर खर्च करून खरेदी केलेल्या वस्तू फुटल्या म्हणून आयुष्यभर ओरडत बसायचा.तुला त्याचीच किंमत जास्त' तिच्या या उत्स्फूर्त उत्तरामुळे मी निरुत्तर झालो. या कलाकृती माझ्यासाठी १० डॉलरपेक्षा जास्त होत्या. महाग होत्या म्हणून अमुल्य नव्हत्या तर मी निवडलेल्या त्या कलाकृतींचा अमुल्य नमुना होत्या. पण आता मला त्या वस्तू केवळ १० डॉलरच्याच वाटू लागल्या. ती असे कसे बोलू शकते आणि आमच्या दोघांच्या संबंधात हा किंमतीचा शिक्का कधी पासून आला याबद्दल मला आश्चर्य वाटले.

आपल्याला एखादी वस्तू खूप आवडते पण जेव्हा आपण त्याच्यावरील किंमतीचा टॅग पाहतो तेव्हा आपण त्यासाठी दिलेल्या पैशांबद्दल विचार करू लागतो आणि त्या प्रक्रियेत आपण भावनिक बांधिलकीकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपण खरेदी केलेल्या अनेक वस्तू खरेदीच उरतात, त्यांना फारसे भावनिक मुल्य उरत नाही. मीसुद्धा त्याच अवस्थेत अडकलेलो होतो. जेव्हा केव्हा सायलीला एखादी गोष्ट आवडायची, तेव्हा ती माझ्या दृष्टीने आवश्यक नसायची, मी तिला सांगून मोकळा व्हायचो की,'जेव्हा याची गरज भासेल तेव्हा आपण ती वस्तू खरेदी करू. 'उदाहरणार्थ एखादे चांगले वॉल पेंटीग किंवा कानातले रिंग तिला आवडले तर मी म्हणायचो, 'आपल्याकडे आधीच खूप आहेत, आणखी घेण्याची काही गरज नाही, जेव्हा आपल्याकडे जास्तीचे पैसे येतील तेव्हा आपण विकत घेऊ.' या प्रक्रियेत मी तिच्या भावनांच्या बाबतीत संवेदनशील नव्हतो, उलट आवश्यकतेच्या माझ्या समजुती मी तिच्यावर थोपत होतो. चांगले जगण्यासाठी अनेक गोष्टींची भावनिक गरज समजून घ्यायला मी अपयशी ठरलो होतो.