आज (10 मे, बुधवार) बुद्ध जयंती आहे.महात्मा भगवान गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जातात. भगवान बुद्धांनी दुःखाचे मुळ शोधून काढले आणि त्यावरचा उपाय देखील सांगितला. प्रज्ञा-शिल-करुणा ही त्रिसूत्री अंगिकारली तर जीवन सुखकर होईल, असे त्यांनी सांगितले. जगात सर्वांत मोठ्या चार धर्मांमध्ये आज बौद्ध धर्माचा समावेश आहे. बौद्ध अनुयायींची संख्या दिवसागणिक वाढत आहे. पुढे जाणून घ्या, गौतम बुद्धाचे काही विचार, ज्यामुळे जीवनात सुख आणि शांती प्राप्त होऊ शकते...