हिंदू धर्मानुसार माघ मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवशी मुख्यतः ज्ञानाची देवी सरस्वतीची उपासना केली जाते. या वर्षी हे सण 25 जानेवारी, शनिवारी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला देवी सरस्वतीच्या स्वरुपात दडलेले काही लाईफ मॅनेजमेंटचे खास सूत्र सांगत आहोत.
शाळा, कॉलेज आणि इतर शिक्षण संस्थांमध्ये देवी सरस्वतीची प्रतिमा अवश्य लावण्यात आलेली असते.सरस्वती कमळावर बसलेली, एका हातात वीणा तर अन्य दोन हातात पुस्तक आणि माळ, मागे मोर, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले आहेत. देवी सरस्वतीच्या या स्वरुपामागे विद्यार्थी जीवनाचे विविध गूढ रहस्य लपलेले आहेत. जे पुढील प्रमाणे आहेत...
- देवी सरस्वती नेहमी पांढर्या शुभ्र वस्त्रांमध्ये असते. यामागे दोन संकेत आहेत. पहिला,
आपले ज्ञान निर्मळ असावे, विकृत नसावे. तुम्ही जे कोणते ज्ञान अर्जित करत आहात ते सकारात्मक असावे. दुसरा संकेत चारित्र्याशी संबंधित आहे. विद्यार्थी जीवनात कोणताही दुर्गुण आपल्या चारित्र्यावर नसावा.
पुढे जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...