आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रामधून : हे 8 लोक अचानक समोर आले तर काय करावे?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये मनुस्मृतीचे विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये आयुष्याला सुखी आणि संस्कारी बनवण्याचे अनेक सूत्र सांगण्यात आले आहेत. या ग्रंथाची रचना महाराज मनु यांनी महर्षी भृगु यांच्या मदतीने केली होती असे मानले जाते. मनुस्मृतीमध्ये सांगण्यात आलेले लाईफ मॅनेजमेंटचे काही खास सूत्र आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. मनुस्मृतीच्या एका श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की, कोणते लोक समोर आल्यानंतर स्वतः मार्ग सोडून त्यांना जाण्यासाठी मार्ग द्यावा.

श्लोक
चक्रिणो दशमीस्थस्य रोगिणो भारिणः स्त्रियाः।
स्नातकस्य च राज्ञश्च पन्था देयो वरस्य च।।

अर्थ - रथावर स्वार असलेला व्यक्ती, वृद्ध, रोगी, ओझे उचललेला व्यकी, स्त्री, स्नातक, राजा, वर (नवरदेव) या आठ जणांना स्वतः बाजूला सरकून पुढे जाण्यासाठी मार्ग द्यावा.

1- रथावरील व्यक्ती
मनुस्मृतीनुसार जर आपण कुठे बेर जाताना रथावर स्वार झालेला व्यक्ती समोर आला तर आपण स्वतः बाजूला सरकून त्याला मार्ग द्यावा. लाईफ मॅनेजमेंटच्या दृष्टीने, रथावर स्वार असलेला व्यक्ती एखाद्या उच्च राजकीय पदावर असू शकतो किंवा तो राजाच्या जवळचा व्यक्तीसुद्धा असू शकतो. मार्ग न देण्याच्या स्थितीमध्ये तो तुमचे नुकसान करू शकतो. यामुळे सांगण्यात आले आहे की, रथावर स्वार असलेल्या व्यक्तीला लगेच मार्ग द्यावा. वर्तमानात रथाची जागा दोन आणि चार चाकांच्या वाहनांनी घेतली आहे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आणखी कोणते लोक समोर आल्यानंतर मागे सरकावे...
बातम्या आणखी आहेत...