सध्याच्या काळामध्ये बहुतांश लोकांना धन प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. या कष्टाचा योग्य मोबदला फार कमी लोकांना मिळतो. जर तुम्हाला तुमच्या कष्टाचे संपूर्ण फळ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेली एक चाणक्य नीती नेहमी लक्षात ठेवा.
चाणक्य सांगतात की...
क: काल: कानि मित्राणि को देश: कौ व्ययागमौ।
कस्याऽडं का च मे शक्तिरिति चिन्त्यं मुहुर्मुंहु:।।
हा चाणक्य नीतीच्या चौथ्या अध्यायातील 18वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये चाणक्यांनी सांगितले आहे की, कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी कोणत्या सहा गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. या गोष्टी लक्षात ठेवून काम केल्यास कामामध्ये यश मिळेल आणि काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यास धन प्राप्त होते.
पहिली गोष्ट - हा काळ कसा आहे ?
आचार्य चाणक्य सांगतात की, तोच व्यक्ती समजूतदार आणि यशस्वी आहे, ज्याला या प्रश्नांचे उत्तर नेहमी माहिती असते. समजूतदार व्यक्तीला माहिती असते की, वर्तमान काळ कसा चालू आहे. सध्या सुखाचे दिवस आहेत की दुःखाचे. याच आधारावर तो कार्य करतो. जर सुखाचे दिवस असतील तर चांगले काम करत राहावे आणि दुःखाचे दिवस असतील तर चांगल्या कामांसोबतच धैर्य, संयम बाळगणे आवश्यक आहे. दुःखाच्या दिवसांमध्ये धैर्य, संयम न बाळगल्यास अनर्थ घडू शकतो.
पुढे जाणून घ्या, चाणक्य नीतीच्या इतर खास गोष्टी....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)