आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षक दिन : जाणून घ्या, गुरूसमोर शिष्याने काय करावे आणि काय करू नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या देशात 5 सेप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म झाला होता. हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती तर दुसरे राष्ट्रपती होते. शिक्षण क्षेत्रामधील यांचे अमुल्य योगदान पाहता 5 सप्टेंबरला शिक्षण दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. आपल्या देशात शिक्षक म्हणजे गुरुचे पद खूपच महत्त्वाचे आहे. कबीरदासांनी गुरुचे महत्त्व सांगताना लिहिले आहे की...

गुरु गोविंद दोऊ खड़े, काके लागूं पाय।
बलिहारी गुरु आपकी, गोविंद दियो बताए।।

कबीरदासांनी लिहिलेल्या या ओवीमध्ये गुरूच्या महिमेचे वर्णन करण्यात आले असून गुरूचा ईश्वरापेक्षा श्रेष्ठ सांगण्यात आले आहे. आपल्या देशात गुरुचे स्थान सुरुवातीपासूनच श्रेष्ठ आहे. धार्मिक ग्रंथामध्ये गुरूच्या महिमेचे वर्णन आढळून येते. भविष्यपुराणातील ब्राह्मपर्वमध्येही गुरुचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

त्यानुसार गुरूसमोर हात जोडून उभे राहावे, गुरूची आज्ञा असेल तर बसावे परंतु आसनावर बसू नये. वाहनावर असाल तर गुरुचे अभिवादन करावे, वाहनावरून उतरून नमस्कार करावा. शरीर त्यागापर्यंत जो गुरूची सेवा करतो, त्याला श्रेष्ठ ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. गुरूला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ सांगण्यामागे तर्क असा आहे की, ज्ञान केवळ गुरूच्या माध्यमातूनच प्राप्त केले जाऊ शकते. हेच ईश्वरीय ज्ञान आहे, जे गुरूच्या माध्यमातून पृथ्वीवर अवतरते.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, गुरूसमोर कोणत्या गोष्टी करू नयेत...