आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान जागेचा कमाल उपयोग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पाय-या खालील रिकाम्या जागेत बदल करून स्वयंपाकघर, कार्यालय, कपाट किंवा सायकल ठेवण्यासाठी वापरल्यास या जागेचा पुरेपूर लाभ घेता येईल. त्यासाठी पुढीलपैकी काही पद्धतींचा वापर करू शकाल.

*पाय-या खाली स्वयंपाकघर छान दिसेल. घरात जागेची कमतरता असेल तेव्हाच असे करा. या जागेवर मॉड्यूलर किचनच्या साहाय्याने स्वयंपाकघर सेट करणे सोपे होईल. त्यामुळे शेगडी, गॅस, सिंक वगैरेंचे टेन्शन राहणार नाही. भिंतीवर कपाट किंवा स्लॅब बनवून त्यावर भांडी ठेवा. डाळी, मसाले किंवा स्वयंपाकघरात लागणा-या इतर वस्तू ठेवण्यासाठी ‘स्पाइस वॉल’ बनवता येईल. त्यासाठी लाकडाचे लहान-लहान ब्लॉक बनवा. या ब्लॉक्समध्ये छोट्या बाटल्या, मसाले ठेवल्यावर सुंदर दिसेल.

*रिकाम्या जागेवर बूट किंवा घरातील सटरफटर वस्तू ठेवणे ही जुनी कन्सेप्ट आहे. या जागेवर मुलांची सायकल किंवा बाइक सहज ठेवता येते. उर्वरित जागेवर लहान-मोठे शेल्फ बनवून फोटोफ्रेम, कुंड्या अशा डेकोरेशनच्या वस्तू वगैरे ठेवा. या जागेचा वापर एक्स्ट्रा स्टोरेज स्पेससारखा करू नका.

*येथे स्टडी कॉर्नर किंवा ऑफिसही चांगले दिसेल. ही जागा या दोहोंसाठी परफेक्ट आहे. टेबलवर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप ठेवा आणि पुढच्या भिंतीवर शेल्फ बनवून पुस्तके आणि स्टेशनरीच्या इतर वस्तू ठेवता येतील.

*या जागेचे रूपांतर सिटिंग लाउंजमध्येही करता येईल. ही मॉडर्न कन्सेप्ट आहे. त्यासाठी पाय-या खाली लो-लेव्हल सोफा ठेवा. पाय-या च्या अगदी खालच्या भागात एखादे सुंदर चित्रही लावता येईल. येथे फायरप्लेस किंवा एलसीडीही ठेवता येईल.