आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तरे तुम्हाला हव्याहव्याशा प्रश्नांची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्यातील अखेरच्या दिवसांत पडतात असे काही प्रश्न आहेत. हे प्रश्न समजून घ्या. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही चांगली उत्तरे देऊ शकाल.

1 मला माझ्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीचा अभिमान वाटतो का? तुमच्या आतील ऊर्जेचा योग्य वापर केला नाही तर तुम्ही एका क्षणात नष्ट होऊन जाल. मृत्यूला घाबरू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्या अनुभवांना मुकला आहात या गोष्टीचा विचार करा.

2 आयुष्याचा खेळ मी सुंदर पद्धतीने खेळलो का? आयुष्याशी निगडित प्रत्येक गोष्ट म्हणजे एक खेळ असतो. तुम्ही काही कराल अथवा काहीच करणार नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्या.

3 मी माझ्या आयुष्यातील जबाबदार्‍या पेलल्या आहेत का? जबाबदार्‍या पेलत असताना अनेक गोष्टी आयुष्यात आपोआपच जोडल्या जातात. एखाद्या कामासंबंधी जबाबदारी उचलल्याने आयुष्य जगण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो.

4. माझ्या आयुष्यातील किती पाने मी स्वत: लिहिली आहेत? तुम्ही कमकुवत आहात, असे कुणालाही म्हणू देऊ नका. तुमची क्षमता तुम्हाला वाटते त्यापेक्षाही जास्त आहे. इतर व्यक्तींच्या नकारात्मक बोलण्याकडे लक्ष देऊ नका.

5. मी किती आव्हानांमध्ये हार मानून विजय संपादन केला आहे? एखादे आव्हानात्मक ध्येय गाठण्यासाठी अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागतो. त्याग केल्याशिवाय यश मिळवणे हे न चालता थेट धावणे शिकण्यासारखे आहे.

6 मी काही नवा शोध लावला आहे का? जीवनात अनेक महत्त्वपूर्ण बाबी अनपेक्षितरीत्या साध्य होत असतात. आपले ध्येय आणि स्वप्न समजदारपणे आणि मेहनतीने पूर्ण करा. मात्र त्यात एवढेही गुंतून जाऊ नका की ते पूर्ण न झाल्यास तुम्हाला दु:ख होईल.