आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Life Management Tips About Happy Life From Ramcharit Manas

अडचणींपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा, कोणासोबत कोणती चर्चा करू नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेतला आणि त्याच्यासोबत न करण्यायोग्य गोष्टीची चर्चा केली नाही तर आपण अडचणींपासून दूर राहू शकतो. येथे श्रीरामचरितमानस ग्रंथानुसार जाणून घ्या, आपण कोणत्या स्त्री आणि पुरुषाशी कोणत्या विषयावर चर्चा करू नये.
असा आहे प्रसंग...
जेव्हा हनुमानाने श्रीरामाला देवी सीता रावणाच्या लंकेत असल्याचे सांगितले तेव्हा श्रीराम वानर सैन्यासोबत दक्षिण भागातील समुद्र किनारी पोहोचले. समुद्र पार करून सर्वांना लंकेत प्रवेश करणे गरजेचे होते. श्रीराम तीन दिवस वानर सेनेसहित समुद्राच्या काठावर थांबले होते. श्रीरामाने समुद्राकडे विनंती केली की, लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी वानर सैन्याला मार्ग द्यावा. परंतु समुद्राने श्रीरामाची विनंती मान्य केली नाही आणि यामध्येच तीन दिवस निघून गेले. तीन दिवसानंतर श्रीराम समुद्रावर क्रोधीत झाले आणि लक्ष्मणाला म्हणाले की -

बोले राम सकोप तब भय बिनु होइ न प्रीति।।
या दोह्याचा अर्थ असा आहे की - श्रीराम रागात येउन लक्ष्मणाला म्हणतात, 'भय बिना प्रीति नहीं होती' म्हणजे भीती दाखवल्याशिवाय कोणीही आपले काम करत नाही.
श्रीराम म्हणतात -
लछिमन बान सरासन आनू। सोषौं बारिधि बिसिख कृसानू।।
सठ सन बिनय कुटिल सन प्रीती। सहज कृपन सन सुंदर नीती।

मूर्ख म्हणजे जड बुद्धी असणार्‍या लोकांना प्रार्थना, विनंती करू नये...
श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात - हे लक्ष्मण! धनुष्यबाण घेऊन ये, मी अग्नी बाणाने समुद्राला आटवून टाकतो. एखाद्या मुर्खाशी विनयाच्या गोष्टी करू नयेत. कोणताही मूर्ख व्यक्ती इतरांच्या प्रार्थना, आग्रहाला, विनंतीला समजू शकत नाही, कारण त्याची जड बुद्धी असते. मूर्ख लोकांना घाबरवूनच त्यांच्याकडून काम करून घेतले जाऊ शकते.

पुढे जाणून घ्या, आणखी कोणत्या लोकांशी कोणकोणत्या विषयांवर चर्चा करू नये...