आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्याकडून काम करून घेतल्यानंतर या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकवेळा लोक स्वतःचा स्वार्थ साध्य झाल्यानंतर नात्याकडे दुर्लक्ष करतात. नाते व्यावसायिक असेल तर तुटायला वेळ लागत नाही. एखादे हृदयाजवळचे नाते असेल तर पहिले कटुता येते, नंतर दुरावा येतो आणि शेवटी नाते समाप्त होते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, जेव्हाही तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदतीचा हात देता किंवा एखाद्याचा हात घेता, तेव्हा तुम्ही फक्त त्याला आधार देत नसता तर तुम्हालाही एक आधार मिळालेला असतो.

नात्यातील सुख, आनंद तेव्हाच मिळते, जेव्हा दोन्ही पक्ष एकमेकांबद्दल निष्ठा आणि विश्वास बाळगतात.