महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथ खूप विस्तृत आहे. यामधील कथा जेवढा मोठ्या तेवढ्याच रोचक आहेत. शास्त्रामध्ये महाभारताला पाचवा वेद मानण्यात आले आहे. या ग्रंथामध्ये एकूण एक लाख श्लोक आहेत, यामुळेच याला शतसाहस्त्री असेही म्हणतात. महाभारतच्या उद्योगपर्वात युद्धापूर्वी महात्मा विदुर राजा धृतराष्ट्र यांना लाइफ मॅनेजमेंटशी संबंधित अनेक गोष्टी सांगतात. यालाच विदुर नीती असेही म्हटले जाते. विदुर नीतीनुसार काही लोकांना चांगल्या-वाईट गोष्टींचे ज्ञान नसते, यामुळे यांच्यापासून दूर राहण्यातच फायदा आहे. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या लोकांपासून आपण दूर राहावे...
कामुक व्यक्ती
विदुर नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीवर वासनेचा प्रभाव जास्त असेल तर त्याला चांगल्या-वाईट गोष्टींचे भान राहत नाही. कामुक व्यक्ती स्वतःच्या तृप्तीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशा लोकांसोबत राहणार्या व्यक्तीलाही अनेकवेळा अपमानाला सामोरे जावे लागू शकते. नियमित अशा लोकांसोबत राहणार्या व्यक्तीला नेहमी संकटांचा सामना करावा लागतो. यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणकोणत्या नऊ लोकांपासून दूर राहावे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)