आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्कृष्ट राहणीमान हवे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही गुणांचा प्रवेश अचानक होतो. हळूहळू ते आपल्या अंगवळणी पडून सवयच बनतात. बहाणेबाजी असाच एक खतरनाक गुण आहे. अस्ताव्यस्त जीवनशैलीपासून याचा प्रारंभ होतो. टापटीप राहण्याची सवय नसेल तर माणूस बहाणेबाजी शिकतो. आपण जर टापटिपीने राहत नसलो तर आजूबाजूचे लोकही आपल्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. व्यवस्थित राहणीमान नसणे हे हळूहळू भिनणारे विष आहे. टापटिपीने न राहणारा माणूस एकप्रकारे धुंदीतच असतो. जे लोक हा दोष दूर करू इच्छितात त्यांनी याची सुरुवात शेवटापासूनच करावी.

एखादे काम बिघडले असेल तर त्याला मध्येच ठीक करणे कठीण जाते. व्यवस्थित राहण्याची सुरुवात सकाळी उठल्यापासूनच करावी. जे बेफिकीर लोक आहेत, विशेषत: मुलांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, त्यांची दिनचर्या लवकर सकाळी उठण्यापासून सुरू करावी. योग्य वेळी सुरुवात झाली तर येणार्‍या अडचणी दूर होण्यास मदत होते, हा अनुभव आहे.

सकाळी उठणे आणि रात्री लवकर झोपणे या क्रिया करत असतात त्यांना व्यवस्थित राहणीमानासाठी अन्य संधी मिळते. तिसरी संधी पूजेच्या वेळी बसले असताना होते. या वेळी मात्र सचेत राहण्याची गरज असते. कारण तुमच्या आसपास एक दिव्य शक्ती वावरत असते. ज्याप्रमाणे उठल्यानंतर अथवा झोपल्यानंतर आपली ऊर्जा अत्यंत निकट असते. या वेळी घाईगडबड करू नका. व्यवस्थित राहणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे.