आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे बनायचे तोच विचार करा, तरच बदल घडेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या मनात ज्या गोष्टी आकार घेतात त्याचेच प्रतिबिंब बाहेर उमटते. मानवाचा विचार हाच मानव आहे. आपल्या मनात जे चालले आहे ते बदलाल तर आयुष्यच बदलून जाईल. आपण दिवसभर जो विचार करतो तसेच बनतो. तुमचे लक्ष जर कायम सावलीकडेच असेल तर सूर्याला कधी पाहूच शकणार नाहीत.

तुम्ही गाडीने ऑफिसला किंवा बाजारात जात असाल आणि मनात विचार असेल की, आज पार्किंगला जागाच मिळणार नाही, तर तसेच घडेल. मात्र याचदरम्यान आपण एका गोष्टीकडे लक्ष देत नाही. ती म्हणजे पार्किंगमधून एक कार निघून गेल्यानंतर तिथे दुसर्‍या गाडीला लगेच जागा मिळते. पण आपण असाच विचार केला की आज माझ्या गाडीला पार्किंगसाठी जागा मिळेलच, तर विश्वास ठेवा, नक्की असेच घडेल.

एक तरुण नावाडी प्रथमच समुद्रात गेला. उत्तर अटलांटिक समुद्रात वादळात जहाज फसले. तरुण नावाड्याला पाल उघडण्यास सांगण्यात आले. तो जसा वर जाऊ लागला, त्याची नजर खाली गेली. त्याचे संतुलन बिघडले. तेवढ्यात खालून एका जुन्या-जाणत्याने मोठ्याने ओरडून सांगितले की वरतीच पाहा. तरुण नावाड्याने असे करताच त्याचे संतुलन पुन्हा मिळाले. त्यानंतर तो खाली येताच तो जुना-जाणता म्हणाला की, जेव्हा बघण्याचा दृष्टिकोन योग्य नसेल तर नेहमी समोरच पाहिले पाहिजे.

आपण जे आहात त्याचे निरीक्षण करून आतमध्ये डोकावून पाहा. आपल्याला जे बनायचे आहे किंवा बनण्याची इच्छा आहे तेही पाहा. इथे विश्वास आणि विज्ञान या दोन्ही बाजू आहेत. वास्तवात आपण यांना स्वत:च्या आयुष्यातही वापरू शकतो. स्वत:शी संवाद करणे सुरू करा. दिवसाची सुरुवातच या दृढ विश्वासाने करा की, सर्व काही बदलणार आहे. इरादा पक्का केला, मात्र प्रत्यक्ष पाऊल पडले नाही तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे आपला विश्वास कृतीने मजबूत करा. संधीकडे अशा नजरेने पाहा की सारे आयुष्यच यावर अवलंबून आहे. हाती आलेली एकही संधी दवडू नका. मेंदूचा, विचारांचा विस्तार झाला की जीवन पुढे जाईल. संधी तुमच्या प्रतीक्षेत आहे. फक्त तिला आपल्या जीवनात घेऊन या. योग्य विचार ठेवा आणि जीवनही योग्य, सुकर बनवा.