मुसळधार पाऊस सुरु असलेली बंगळूरूमधील एक रविवारची प्रसन्न संध्याकाळ. बाहेर जाण्याच्या माझ्या सर्व योजना मी रद्द केल्या. घरीच राहून मी आनंद लुटण्याचा निर्णय घेतला. कपभर गरमागरम चहा घेण्याची माझी इच्छा झाली आणि जणू काही माझ्या मनातील हेरूनच माझी पत्नी वैशाली चहाचे दोन कप घून किचनमधून बाहेर आली. माझा मुलगा आर्य त्याची इटुकली पावले टाकत तिच्या मागोमाग आला. हे एका परिपूर्ण घराचे चित्र होते. रेडिओवर नवीन चित्रपटांची गाणी सुरु होती. मी आणि वैशाली चहाचे घोट घेत घेत आस्वाद घेत होतो. रेडिओवर सुरु असलेल्या गाण्याचे बोल माझ्या कानी पडले, 'तेरे संग एक सिंपल सी कॉफी भी
किक देती है, तेरे संग...' (जेव्हा मी तुझ्या बरोबर असतो तेव्हा साधी कॉफीही आनंद देऊन जाते) गाण्याच्या या ओळींनी मी घेत असलेल्या चहाच्या गोडव्यात आणखीच भर पडली.
सायंकाळ रात्रीमध्ये खुलून गेली तरीही त्या गाण्याचे बोल माझ्या मनात रुंजी घालत होते. मी ते गाणे अजूनही गुणगुणत होतो आणि विचार करत होतो की, 'आनंद देणारी कॉफी आहे की सहवास?' जर आनंद देणारी कॉफी असेल तर कॉफीचे आणखी कप प्याल्यानंतर आणखी जास्तीचा आनंद मिळायला हवा. मी आणखी काही कप चहा किंवा कॉफी घेतली तर त्याची परिणीती माझे पित्त वाढण्यात होईल आणि ती आनंददायी सायंकाळ एका त्रासदायक सायंकाळीमध्ये बदलून जाईल, असा विचार माझ्या मनात आला. याचा अर्थ कॉफी स्वतः आनंद देऊ शकत नाही तर मी आणि वैशाली उपभोगत असलेला सहवास आनंददायी आहे. अनेकवेळा मी एकता बसून चहाचा आनंद घेतला आहे. पण या संध्याकाळी मी घेत असलेला आनंद, पाऊस, वैशालीच्या चेहऱ्यावर झळकत असलेले प्रेम आणि माझ्याबद्दलची आत्मीयता, आर्यचे लुकलुकणारे डोळे हे सर्वकाही माझा आनंद द्विगुणीत करत होते. महात्रीयाने
विवाहाचे' सहवासातला आनंद' असे नेहमीच वर्णन केले आहे. त्यांना त्यातून काय ध्वनित कारायचे असेल ते असो पण सर्वप्रकारचा सहवास हा सहवासाचा आनंद आहे, असे मला वाटू लागले आहे. भूतकाळातील एकटेपणा आणि सहवासात घालवलेले सर्व क्षण माझ्या मेंदूच्या पटलावर झरकन आले.
लेख पूर्ण वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...